17 April 2025 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

Pune Kasba Bypoll | रवींद्र धंगेकर राज ठाकरेंसहित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि 12 मंत्र्यांविरोधात ठासून निवडून आले

Pune Kasba Bypoll

Pune Kasba Bypoll | कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाल. पुण्यात आजचा निवडणूक निकालाच आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

त्यामुळे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची प्रतिक्षा अखेर संपली असून, भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले आहेत. काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने तगडी फाईट देत मोठा विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कसब्यामध्ये भाजप उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिलेला होता. मात्र, असं असताना देखील मनसेचे काही कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याचं चित्र होतं. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होती. मात्र मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला राज ठाकरेंचा हा निर्णय आवडला नव्हता.

राज ठाकरेंसहित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि १२ मंत्र्यांनाही धूळ चारली :
पुण्यातील १०० पेक्षा जास्त माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौज आधीच हेमंत रासने यांच्यासाठी कामाला लागली होती. पण धंगेकारांचा झंझावात पाहता यांचा टिकाव लागत नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री कसब्यात तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. इतकंच काय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यात घर घेऊन ते प्रत्येक अपडेटवर जातीने लक्ष ठेऊन होते. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठीही राज्यातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली. मात्र धंगेकरांच्या भोवतीच निवडणूक राहील, याची पुरेपूर काळजी संबंधित नेत्यांनी घेतली. त्याचा परिपाक म्हणजे भाजपला ही निवडणूक मोदी-शहा विरुद्ध काँग्रेस अशी करण्याची संधी मिळालीच नाही. पर्यायाने शेवटपर्यंत ही निवडणूक भाजप विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच राहिली.

कसब्याच्या निवडणुकीचा इतिहास :
यापूर्वी म्हणजे 1991मध्ये झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसचा सातत्याने पराभव होत गेला. भाजपाने ही जागा राखली होती. 1995 पासून ही जागा भाजपकडे होती. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी तब्बल 25 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. 2019मध्ये गिरीश बापट खासदार झाले. त्यानंतर मुक्ता टिळक यांना तिकीट देण्यात आले. मुक्ता टिळक या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचं वर्चवस्व कायम राहिलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pune Kasba Bypoll MLA Ravindra Dhangekar check details on 02 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune Kasba Bypoll(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या