22 February 2025 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज
x

देशाच्या पायाभूत प्रकल्पापासून ते संरक्षण क्षेत्रात अदानी ग्रुप, मग त्याच कंपनीत चीनमधली व्यक्ती पैसा का गुंतवतेय? - राहुल गांधी

Rahul Gandhi

Rahul Gandhi | संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अहवाल प्रोजेक्टच्या वतीने अदानी समूहावर नव्याने आरोप केल्याबद्दल काँग्रेसने गुरुवारी मोदी सरकारवर हल्ला बोल केला. पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत अदानी समूहावर नवे आरोप केले आहेत. देशाच्या पायाभूत प्रकल्पापासून ते संरक्षण क्षेत्रात अदानी ग्रुप, मग त्याच कंपनीत चीनमधली व्यक्ती पैसा का गुंतवतेय? असा गंभीर प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, दोन आघाडीच्या जागतिक वृत्तपत्रांनी अदानी प्रकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. सेबीवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, “सेबीने चौकशी केली, पण अदानीयांना क्लीन चिट देण्यात आली. नंतर त्याच व्यक्तीला अदानींच्या NDTV मध्ये डिरेक्टर पदावर नेमणूक करण्यात आली आणि हे सर्व एका रॅकेट प्रमाणे आहे, त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे अगदी स्पष्ट होतंय असं राहुल गांधी म्हणाले.

अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष INDIA आघाडीच्या तिसऱ्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत केली. अदानी समूहावर नवे आरोप करताना राहुल गांधी यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदी गप्प का आहेत, चौकशी का होऊ देत नाहीत? जी-20 बैठकीपूर्वी भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पंतप्रधान मोदींनी कारवाई करावी, या प्रकरणाची चौकशी करावी.

संसदेच्या विशेष अधिवेशनावर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात, “मला वाटतं कदाचित हे थोडं अस्वस्थ होण्याचं लक्षण असेल. संसद भवनात बोलताना ज्या प्रकारची घबराट झाली, त्याच प्रकारची अस्वस्थता अचानक माझे संसद सदस्यत्व रद्द करण्यास कारणीभूत ठरली. त्यामुळे मला वाटते की ही चिंताजनक बाब आहे, कारण ही प्रकरणे पंतप्रधानांच्या अगदी जवळची आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही अदानी प्रकरणाला हात लावता तेव्हा पंतप्रधान खूप अस्वस्थ आणि घाबरतात असं राहुल गांधी म्हणाले.

News Title : Rahul Gandhi attacks Modi government on new allegations against Adani group 31 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x