22 November 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Rahul Narvekar | अध्यक्ष महोदय तुमचं अभिनंदन, पण किती दिवस पदावर राहाल माहित नाही- सुनील प्रभू

Rahul Narvekar

Rahul Narvekar | विधानसभेत शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची आज निवड झाली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतं मिळून विजयी झाले आहेत. विजयासाठी 145 मतांची गरज असताना राहुल यांना समर्थनार्थ 164 मते मिळाली. राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी अभिनंदन केले. यामध्ये सुनील प्रभू यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं विरोधात मतदान :
सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून काल आदेश दिला होता की शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी राजन साळवी यांना मतदान करावे. परंतु आज सभागृहात व्हीप नाकारत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विरोधात मतदान केले.

सुनील प्रभू सभागृहात म्हणाले :
सुनील प्रभू सभागृहात म्हणाले की शिवसेनेच्या 39 सदस्यांनी विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे तुम्ही किती दिवस अध्यक्षपदावर राहाल माहित नाही. तरीही तुमचं अभिनंदन करतो असे सुनील प्रभू म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले ”अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्याकडे कायदामंत्री म्हणून पाहात होतो, परंतु तुम्हाला विधानसभा अध्यक्ष केलं. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झालेले पाहून आम्ही आमचं दु:ख विसरलो आणि त्यांचं दु:ख जास्त झालं.” शिवसेनेच्या 14 आमदारांनी राजन साळवी यांना मतदान केले आहे. एकूण 107 सदस्यांनी राजन साळवी यांना मतदान केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rahul Narvekar appointed as Maharashtra Assembly Speaker check details 03 July 2022.

हॅशटॅग्स

#Rahul Narvekar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x