15 December 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

राजस्थानमध्येही गुजरात लॉबीची एकाधिकारशाही, वसुंधरा राजे माज उतरवण्याच्या तयारीत, वरिष्ठ नेत्यांचे राजस्थानमध्ये दौरे वाढले

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan Assembly Election 2024 | राजस्थान भाजपमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणे पुन्हा एकदा रखडल्याचे वृत्त आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा जयपूरमध्ये दाखल झालेल्या जेपी नड्डा-आमती शहा आणि बीएल संतोष यांनी साडेसहा तास कोअर कमिटीची बैठक घेतली. पण अनेक जागांवर मतभेद आहेत. तिकीट वाटपावरून अंतर्गत गदारोळ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हायकमांडला ३० ते ३५ आमदारांची तिकिटे कापायची आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आमदार वसुंधरा राजे यांचे समर्थक मानले जात असल्याची चर्चा आहे. अनेक जागांवर मतभेद आहेत. त्यामुळे पहिली यादी जाहीर होणे रखडले आहे. अमित शहा, जेपी नड्डा आणि बीएल संतोष आज संघाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

संघटनेकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच पहिली यादी जाहीर केली जाईल. पक्षांतर्गत दुफळी उफाळून आलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची यादी भाजपने यापूर्वीच जाहीर केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचं स्थानिक पक्ष संघटन इतकं भक्कम आहे की भाजपच्या गुजरात लॉबीला अक्षरशः घाम फुटल्याचे स्थानिक पत्रकार सांगत आहेत. पण राजस्थानमध्ये एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. कारण वसुधारा राजे आता गुजरात लॉबीची एकाधिकारशाही आणि राजकीय माज उतरविण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यांच्या हालचाली पाहून गुजरात लॉबीचे राजस्थान दौरे सुद्धा निष्फळ ठरत आहेत.

जेपी नड्डा आणि अमित शहा यांनी घेतला अभिप्राय
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, बीएल संतोष आणि अमित शहा यांनी निवडणुकीचा अभिप्राय घेतला आहे. दोन्ही नेते बुधवारी संध्याकाळी जयपूरला पोहोचले होते.

कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील नेत्यांसोबत सखोल विचारमंथन करण्यात आले. खासदार दीया कुमारी यांना योग्य वेळी बैठकीला बोलावले होते. अशा परिस्थितीत कुमारी विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. भाजपची पहिली यादी केव्हाही जाहीर होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत एकमत होत असल्याचे बोलले जात आहे.

परिवर्तन यात्रेत हाणामाऱ्या, रिकाम्या खुर्च्या आणि गटबाजीबाबत अमित शहा यांची नाराजी
जेपी नड्डा आणि शहा यांनीही अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. परिवर्तन यात्रेला ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी गर्दी जमली नाही, अशी चर्चा आहे. नेत्यांच्या गटबाजीमुळे परिवर्तन यात्रेला अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचा विरोधही सहन करावा लागला. यासोबतच नड्डा आणि शहा यांनी राज्यस्तरीय नेत्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेबाबतही नेत्यांना सल्ला दिला आहे.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत, कैलास चौधरी, राज्य निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी, निवडणूक प्रभारी अरुण सिंह, राज्य सहनिवडणूक प्रभारी विजया रहाटकर, कुलदीप बिश्नोई, विरोधी पक्षनेते सतीश पूनिया, खासदार राज्यवर्धनसिंह राठोड उपस्थित होते. राज्यवर्धनसिंह राठोड आणि विरोधी पक्षनेते सतीश पूनिया हे सर्वप्रथम बैठकीतून बाहेर पडले, पण दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. या दोन्ही नेत्यांच्या जाण्यानंतरही उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

News Title : Rajasthan Assembly Election 2023 BJP Political Panic check details 28 September 2023.

हॅशटॅग्स

#Rajasthan Assembly Election 2023(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x