27 April 2025 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

गुजराती नेते राजस्थानीमध्ये येऊन मतं मागत आहेत, मोदींचा जुना संदर्भ देतं गेहलोत यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ब्रम्हास्त्र चालवलं

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan Assembly Election 2023 | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ‘बाहेरचे विरुद्ध स्थानिक’ कार्ड खेळले आहे. स्वत:ला राजस्थानी म्हणवून घेत गेहलोत म्हणाले की, गुजराती येऊन मते मागत आहेत, ते कुठे जातील.

गेहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जुन्या वक्तव्याचा (गुजरात विधानसभा निवडणूक) संदर्भ देत म्हटले की, त्यांनीही यापूर्वी असेच बोलून गुजरातमधील निवडणूक उलटवली होती आणि स्वतःला मी गुजराती आहे, इतर बाहेरचे आहेत असे म्हटले होते याची आठवण लोकांना करून दिली.

2017 च्या गुजरात विधानसभेचा संदर्भ देत गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींवर गुजराती कार्ड खेळून निवडणूक बदलली. “त्यावेळी मी प्रभारी होतो. पंतप्रधान मोदी, जे एक अभिनेता देखील आहेत, मी ओबीसी आहे, त्यांनी मला हीन म्हटले असा कांगावा प्रचारात केला होता.. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना कोणी हीन म्हणत नव्हते. कारण त्यातून वातावरण बिघडले असते. “बंधू-भगिनींनो, मी इथं आलोय, जर तुम्ही मारवाडीचं ऐकलं तर मी सांगतो, मी कुठे जाणार? कोणाकडे जाणार? ते गुजराती बनून मते मागत आहेत.

“आता गुजराती नेते इथे येत आहे. गुजराती आले असे आम्ही म्हणत नाही. बंधू-भगिनींनो, तुमचा त्या गुजरातीवर विश्वास असेल तर मी तुम्हाला सांगतो. राजस्थानात एक गुजराती इथे येऊन मतं मागत आहे, असंही मी म्हणतोय. पण मी तुमचा आहे, मी तुमच्यापासून दूर नाही. मी कुठे जाईन? असं गेहलोत म्हणाले.

News Title : Rajasthan Assembly Election 2023 CM Ashok Gehlot 23 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rajasthan Assembly Election 2023(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony