22 February 2025 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Rajasthan Assembly Election 2023 | राजस्थानमध्ये गुजराती प्रयोग फसले? वसुंधरा राजे बंडाच्या भूमिकेत, भाजपचे दिल्लीश्वस चिंतेत

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan Assembly Election 2023 | गुजरात आणि मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थान विधानसभा निवडणुकीतही गुजरातचा एकाधिकारशाही प्रयोग करण्याची भाजप हायकमांडची इच्छा आहे. भाजप आमदारांची तिकिटे मोठ्या प्रमाणात कापून खासदारांना आणि केंद्रीय मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्याचा हायकमांडची योजना आहे.

पण राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यासाठी तयार नाहीत आणि त्या गुजरात लॉबीच्या एकाधिकारशाही टक्कर देतं आहेत. वसुंधरा राजे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे भाजप हायकमांड बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच उमेदवारांची यादी अंतिम होत नाही. शनिवारी दिल्लीत वसुंधरा राजे, प्रल्हाद जोशी आणि जेपी नड्डा यांच्यात तिकिटांबाबत चर्चा झाली. परंतु अंतिम यादी निश्चित झालेली नाही.

वसुंधरा राजे यांच्या बंडखोर भूमिकेमुळे मोदी -शहा गुजरात आणि मध्य प्रदेशाप्रमाणे राजस्थानमध्ये प्रयोग करण्यास कचरत आहेत. वसुंधरा राजे यांच्या वक्तव्यामुळे भाजप हायकमांड बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे. जयपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी वसुंधरा राजे यांचे नाव घेतले नाही. भाजप हायकमांडला ते आवडत नसल्याची चर्चा आहे. पण पंतप्रधान मोदींनी आवडी-निवडीच्या नावाखाली हिमाचल-कर्नाटकप्रमाणे राजस्थान गमावणार का, हा मोठा प्रश्न आहे. कारण एका सर्व्हेमध्ये काँग्रेसने दोन महिन्यांतच जबरदस्त पुनरागमन केल्याचं पाहायला मिळतंय.

तिकिट वाटप रखडलं
गुजरातमध्ये भाजपने ‘नो रिपीट फॉर्म्युल्या’ने दणदणीत विजय मिळवला होता, पण त्याचं कारण मोदी-शहा मूळचे गुजरातचे होते हे होतं. आता गुजरात शेजारच्या राज्यात केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांच्यासह अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला हाच प्रयोग राजस्थानमध्ये करायचा आहे. पण माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे बंडाच्या भूमिकेत आहेत. वसुंधरा राजे यांना बीएम येडियुरप्पा व्हायचे नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच राजस्थानमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपला घाम गाळावा लागत आहे. उमेदवारांची यादी अंतिम होत नाही. तर शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात दोन याद्या आल्या आहेत.

हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक – भाजपचा दारुण पराभव
हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मोदी-शहांच्या समोर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दोन्ही राज्यात भाजपने नवे प्रयोग केले. पण यश आले नाही. अशा परिस्थितीत भाजप हायकमांड इच्छा असूनही वसुंधरा राजेंकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

वसुंधरा राजे या राजस्थानच्या राजकारणातील प्रमुख नेत्या आहेत. मोदी-शहांच्या हालचालीवर सध्या वसुंधरा राजे समर्थकांनीही मौन बाळगले आहे. तर वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे नेते निवडणुकीत चांगलेच सक्रिय झाले आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, खासदार दीया कुमारी आणि माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया हे वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

News Title : Rajasthan Assembly Election 2023 Vasundhara Raje 01 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rajasthan Assembly Election 2023(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x