27 April 2025 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

Rajasthan Assembly Election | नो मोदी, फक्त गेहलोत, राजस्थानच्या मतदारांना पुन्हा काँग्रेस सरकार हवं, सर्व्हेत नो मोदी मॅजिक

Rajasthan Assembly Election

Rajasthan Assembly Election | राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला दिलासा देणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्व्हेनुसार राज्यात काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करू शकते. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळणार आहे. कारण दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याचा राजस्थानमधील इतिहास यंदा काँग्रेस पक्ष खंडित करणार आहे. विशेष म्हणजे राजस्थानची निवडणूक भाजप यंदा मोदींच्या चेहऱ्यावर लढवणार असून त्याचा काहीच फायदा भाजपाला होणार नाही हे देखील समोर आलं आहे.

मात्र या निवडणुकीत वसुंधरा राजे भाजासोबत आहेत असं गृहीत धरून सर्व्हेत ही आकडेवारी दिली. मात्र प्रत्यक्ष जमिनीवर वसुंधरा राजे समर्थक भाजप (मोदी-शहा) विरोधात प्रचार करत असल्याचं वृत्त आहे. ते खरं ठरल्यास काँग्रेसच्या विजयाचा आकडा सर्व्हेत आकडेवारीपेक्षा खूप मोठा असून शकतो असा देखील अंदाज आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार

राजस्थान निवडणुकीपूर्वी आयएएनएस-पोलस्टॅटने 6705 लोकांचे ओपिनियन पोल केले होते. या सर्व्हेनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २०० पैकी १०१ जागा मिळू शकतात. तर भाजपला यावेळी 93 जागा मिळू शकतात. या सर्व्हेनुसार काँग्रेसला कमीत कमी 97 ते 105 जागा मिळू शकतात. तर भाजपला 89 ते 97 जागा मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांची मतदारांमध्ये जादू

या सर्व्हेमध्ये राजस्थानच्या लोकांना त्यांचा लोकप्रिय नेता विचारण्यात आला. राज्यातील ३८ टक्के जनतेने अशोक गेहलोत यांना आपले आवडते नेते म्हणून घोषित केले. तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्या बाजूने 26 टक्के लोकांनी मतदान केले. विशेष म्हणजे काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांना राज्यातील २५ टक्के जनतेने आपला आवडता नेता म्हणून संबोधले होते. तर सर्व्हेमध्ये 48 टक्के लोकांनी सीएम गेहलोत यांच्या कामाला चांगले रेटिंग दिले आहे.

भाजपला एक धक्का, पण थोडा दिलासा सुद्धा

या सर्व्हेनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण ४० टक्के मते मिळू शकतात. 2018 मध्ये भाजपला 39 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच भाजपच्या मतांची टक्केवारी एक टक्क्याने वाढू शकते. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपला 89 ते 97 जागा मिळू शकतात.

News Title : Rajasthan Assembly Election IANS Pollstrat survey 15 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rajasthan Assembly Election(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony