14 November 2024 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून ईडी कारवायांचा वापर? | बविआ भाजपला मतदान करणार? | विवा ग्रुपवरील ती कारवाई

Rajya Sabha Election

Rajya Sabha Election | राज्यसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रस्ताव, चर्चा, बैठका यांचं सत्र शुक्रवारी (३ जून) दिवसभर रंगलं. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत काहीही ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे निवडणूक होणारच हे स्पष्ट झालं. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर कधीही विश्वास ठेवावा का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण फडणवीसांचं ‘स्क्रिप्टेड राजकारण’ महाविकास आघाडी विरोधात आधीच ठरलेलं असतं आणि तीच फडणवीस नीती ते भाजपमधील अनेकांचं महत्त्व संपुष्टात आणण्यासाठी सुद्धा ‘गुप्तपणे’ वापरतात. पंकजा मुंडे हे त्याचंच उदाहरण म्हणावं लागेल.

सहावी जागा निवडून आणण्यासाठी घोडेबाजार?
दरम्यान, सहावी जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रात घोडेबाजार, म्हणजेच आमदारांच्या खरेदी-विक्रीचं राजकारण होऊ शकतं. त्या घोडेबाजाराला लगाम लावण्यासाठीची काल महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यासाठी ते फडणवीसांकडे स्वतःहून गेले होते. मात्र फडणवीसांनी त्यांच्या स्किप्टेड राजकारणाचं अस्त्र बाहेर काढलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

बहुजन विकास आघाडीची पलटी ?
कारण, महाविकास आघाडीत सामील असलेली हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करणार आहे. सध्या ही माहिती प्राथमिक स्वरूपात प्राप्त झाली आहे. बहुजन आघाडीची तीन मतं भाजपाला मिळणार आहेत. क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील हे भाजपाला मत देणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपने आता मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र ही जुळवाजुळव करताना भाजपने ईडी अस्त्र म्हणजे यापूर्वी झालेल्या ईडी कारवायांचा आधार घेत ब्लॅकमेलिंग तर केले नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

मेहुल ठाकूर आणि विवा ग्रुप ईडीच्या कचाट्यात :
कारण २३ जानेवारी २०२१ रोजी एचडीआयएल-पीएमसी बँक घोटाळा आणि येस बँक घोटाळ्याशी संबंधित दोन वेगवेगळ्या मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नातेवाईक मेहुल ठाकूर आणि विवा ग्रुपशी संबंधित असलेले आणखी एक व्यक्ती मदन गोपाल चतुर्वेदी यांना अटक केली होती.

महाविकास आघाडी काय उत्तर देणार?
वसईच्या आमदाराच्या कुटुंबातील असलेल्या विरारस्थित विवा ग्रुपच्या परिसरातही सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, छाप्यादरम्यान त्यांना डिजिटल आणि कागदोपत्री पुराव्यासह ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नेमका याच कारवाईचा आधार भाजपने राज्यसभा निवडणुकीत घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे ईडी कारवाया या राजकीय हेतूने प्रेरित असतात याचा पुरावा खुद्द भाजपचं अशा जुळवाजुळवीतून देतंय असं म्हटलं जाणार हे निश्चित आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. विशेष म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही पक्षांमधला संघर्ष अधिक वाढला आहे. त्यामुळे यावर महाविकास आघाडी काय उत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rajya Sabha Election Bahujan Vikas Aghadi will vote to BJP check details 04 June 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x