15 November 2024 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मुस्लिमांच्या 5 टक्के आरक्षणासाठी झटणारे राणे पिता-पुत्र आज इतरांना औरंगजेब का बोलत आहेत? अस्तित्व शिक्कल ठेवण्याची धडपड?

Rane Family

Rane Family Politics | कोल्हापुरात झालेल्या हिंसाचारानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा डीपी ठेवन्यावरून शिवाजी चौकात हिंदू संघटनांच्या मेळाव्यात निषेध करण्यात आला होता. रॅली संपल्यानंतर काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या घरांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर दगडफेक सुरू केली, ज्यामुळे हिंसक निदर्शने झाली. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि ३६ जणांना अटक करण्यात आली.

अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये यापूर्वी संभाजीनगरमध्ये सुद्धा MIM पक्षाशी संबधित कनेक्शन समोर आलं आहे. तसेच MIM आणि भाजपच्या नेत्यांचे किती जवळचे राजकीय संबंध आहेत हे देखील लपून राहिलेलं नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी अशी वातावरण निर्मिती कोण करत असेल यावर वेगळं बोलण्याची गरज नाही.

ज्या राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणं काहीं दिसतं तिथे असे प्रकार उफाळून येण्यास सुरुवात होते हा देखील इतिहास राहिला आहे. यामध्ये भरडले जातात ते सामान्य घरातील तरुण आणि सामान्य कुटुंब. यातून ना मुस्लिमांचं भलं होतं, ना हिंदूंचं. मात्र सामान्य घरातील तरुणांना आणि कुटुंबांना त्यांच्या मूळ गरजा म्हणजे नोकरी आणि महागाई अशा गंभीर विषयापासून दूर फेकण्यात सत्ताधारी राजकीय नेते मंडळी यशस्वी होतात.

सामान्य लोकांची घरे जळोत किंवा त्यात सामान्य तरुण मरोत, त्यात राजकीय नेते स्वतःचा राजकीय स्वार्थ निर्माण करतात. त्यामुळे सामान्य लोकांनी शहाणं होऊन आपल्याच घरातील तरुणांना त्यांच्या मूळ गरजा नोकरी आणि महागाई कमी होणं आहेत हे पटवून दिलं पाहिजे. कारण काही नेते हे ना हिंदूंचे असतात, नाही मुस्लिमांचे. ते आपलं पक्षातील आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी झटत असतात आणि त्यासाठी अशा धार्मिक मुद्यांवर विवादित वक्तव्य करून आपलं राजकारण करत असतात. आता केवळ ‘कणकवली’ विधानसभा मतदारसंघापुरता शिल्लक राहिलेलं राणे कुटुंब देखील त्यातीलच एक असा या कुटुंबाचा राजकीय इतिहास आहे.

नुकतंच भाजप नेते निलेश राणे यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे नवा गदारोळ माजला आहे. शरद पवार हे औरंगजेबाचे पुनर्जन्म आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. एकूण आपण हिंदूंचे पुरस्कर्ते आणि मुस्लिमांचे विरोधक अशी ओरडून-ओरडून राणे कुटुंब स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित आहेत असं पाहायला मिळतंय.

मात्र याच राणे कुटुंबाने मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मिळायला हवं यासाठी आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला होता. मुल्सिम नेत्यांसोबत बैठका आणि मुस्लिम नेत्यांसोबत जेवण ते अजमेरच्या दर्ग्यात आठवणीणे चादर पाठविणे असे नित्याचे उपक्रम या कटुंबाने सुरु केले होते. आगामी आमदार नितेश राणे यांनी अधिकृत ट्विट करून नारायण राणे यांचा मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मिळायला हवं यासाठी पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं.

मात्र आता भाजपमध्ये प्रवेश करून घरातील मंत्रिपद टिकविण्यासाठी मुस्लिम विरोध हा राणे कुटुंबातील नेत्यांचा नेहमीच उपक्रम झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रसार माध्यमं देखील राणे कुटुंबाच्या वायफळ टीकेला आणि पत्रकार परिषदांना केवळ कंटेन्ट मिळत नाही म्हणून हजेरी लावतं का असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Rane

Nilesh Rane

Latest Marathi News : Rane Family Politics for Muslim Community check details on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Rane Family Politics(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x