17 April 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

मतदार किती सतर्क? लोकसभा निवडणुकीपूर्वी गाजर घोषणा होणार, 9 वर्ष झोपलेलं मोदी सरकार गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करणार

Rupees 200 LPG cylinder

Lok Sabha Election | सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत असलेले मोदी सरकार घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत जनतेला निवडणुकीमुळे काही काळासाठी दिलासा देऊ शकते. त्यामुळे मोदी सरकरकडून अचानक गाजर घोषणा होणार असे संकेत मिळू लागले आहेत.

एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात होऊ शकते, असे मीडिया सूत्रांचे म्हणणे आहे. सिलिंडरवरील सबसिडीच्या स्वरूपात मोडी सरकारकडून हा दिलासा दिला जाणार आहे. नुकतेच सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आले होते की, सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवू शकते आणि एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करू शकते.

किंबहुना राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा व्हावा, यासाठी देखील आतापासूनच सबसिडी देण्यासारखा निर्णय मोदी सरकारला घ्यायचा आहे. या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. याशिवाय तेलंगणातही यंदा निवडणुका होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचं वचन मतदारांना दिलं होतं. पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून ९ वर्षात देशात महागाईने नवे विक्रम केले आहेत. तसेच ९ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर चकार शब्द देखील काढताना दिसले नाहीत. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पायउतार होणार असे सर्व्हे सांगत असताना पुन्हा तेच आश्वासनांचं गाजर मतदारांना दाखवलं जाणार आहे असं वृत्त आहे.

त्यासाठीच तब्बल ९ वर्षानंतर १५ ऑगस्टच्या भाषणात महागाईपासून दिलासा देण्यासाठी पावले उचलण्याची घोषणा केली होती आणि महागाईवर केवळ ९ सेकंड बोलले होते. केंद्र सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आला असून याबाबत केव्हाही घोषणा होऊ शकते, अशी माहिती आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सिलिंडर महागाईचा मुद्दा बनवला होता आणि त्याचा परिणामही दिसून आला होता. अशा तऱ्हेने लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका ंच्या पार्श्वभूमीवर महागाईपासून काहीसा दिलासा देण्याची तयारी सरकारने आधीच केली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Rupees 200 LPG cylinder subsidy announcement soon by PM Narendra Modi government 29 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rupees 200 LPG cylinder(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या