20 April 2025 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

पीडितेने Video शेअर केला | बलात्काराचे आरोप झालेल्या खा. शेवाळेंना लोकसभेत शिवसेना पक्षाच्या नेतेपदी नेमण्याचा शिंदेंचा घाट

MP Rahul Shewale

MP Rahul Shewale | शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यासंदर्भातले ट्विट्स या महिलेने पोस्ट केले आहेत. तसंच माझी तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीयेत त्यामुळे मला आता धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे न्याय मिळवून द्यावा असं म्हणत या पीडितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे या पीडित महिलेने पत्रात :
माझ्यावर झालेल्या खासदार राहुल शेवाळेंकडून झालेल्या अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी FIR केलीच नाही तसंच या प्रकरणी तपासही केला नाही. ११ वर्षांपासून राहुल शेवाळे हे सगळं करत आहेत.

माझ्यावर राहुल शेवाळेंनी कसे अत्याचार केले त्याची सीडी दिली आहे. तसंच माझे आणि राहुल शेवाळे यांच्या संबंधाबाबतचे १०० पुरावे दिले आहेत. मात्र राहुल शेवाळे आता हे सगळं नाकारत आहेत. तसंच मी पैशांसाठी त्यांना धमकावत असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी पैशांसाठी कशाला कुणाला धमक्या देईन?

शिंदेंच्या दिल्लीतील राजकीय हालचाली :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री 12 वाजता शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. दिल्लीत जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडकोर खासदारांनी राजधानीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासदार गटाचे गटनेते निवडण्याची तयारी झाली.

मुख्य प्रतोद यांच्या नावानेच पत्र द्या :
बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने लोकसभा सचिवालयाला पत्रही पाठवले. पण या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही बदल सुचवले. मुख्य प्रतोद यांच्या नावानेच पत्र द्या असं शिंदे गटाला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकर पत्र मिळेल अशी आशा कमी झाली आहे.

लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे :
यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. भावना गवळी या शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचं म्हटलं आहे. पण शिवसेनेनं आधीच भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वतीने भावना गवळी यांच्या जागेवर राजन विचारे यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करावी असे पत्र दिले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Serious Rape allegations on MP Rahul Shewale check details 19 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MP Rahul Shewale(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या