22 December 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुख्य निवडणूक आयोग 'मशाल' चिन्ह देखील गोठवणार? मोठी माहिती समोर आली

Shivsena Party Symbol Mashal

Shivsena Party Symbol | निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे बाजूने निर्णय देत शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर पकड मजबूत झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘निवडणूक आयुक्तांनी शेणच खाल्लं.. शेणच खायचं होतं तर आम्हाला हा खटाटोप करायला का लावला? कदाचित उद्या केंद्र सरकारचे गुलाम जे आयुक्त बसलेले आहेत हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील. त्याचीही आपण तयारी ठेवली पाहिजे.’ असं म्हणत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि आयुक्तांबाबत प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरेंचा संयम सुटल्याचंही पाहायला मिळालं.

उद्धव ठाकरे म्हणाले, काय बोलायचं हा मोठा प्रश्न सध्या देशात निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक. मी तर अस म्हणेन की, देशाच्या स्वातंत्र्योत्सव सुरू असून, पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की, 75 वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे आणि आता देशातील लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरूवात केलेली आहे.

मागील काही दिवस निवडणूक आयुक्तांनी हे जे काही थोतांड केलं. ते थोतांड एवढं भयानक आहे की, आमच्याकडे लेखी मागणी काय आहे?, तुम्ही आम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या सदस्यांचे अर्ज द्या. ते आम्ही लाखांमध्ये दिली आहेत. मग हा खटाटोप कशाला सांगितला तुम्ही आम्हाला. तुम्ही जे-जे मागितलं होतं ते-ते आम्ही दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मशाल चिन्ह आणि निवडणूक आयोगाचं निकाल पत्र :
एकाबाजूला धनुष्यबाण चिन्हं आणि शिवसेना पक्षाचं नाव मुख्य निवडणूक आयोगाने निकालपत्रात शिंदे यांना दिलेलं असताना, दुसऱ्या बाजूला अजून एक मोठं वृत्त समोर आलं आहे. कारण, याच निकालपत्रात मुख्य निवडणूक आयोगाने ‘मशाल’ या चिन्हाचा देखील उल्लेख केला आहे. त्यात मुख्य निवडणूक आयोगाने याच ‘मशाल’ चिन्हाला तात्पुरतं चिन्ह असं संबोधताना एकप्रकारे ते देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार नाही अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे. त्याची चुणचुण उद्धव ठाकरेंना लागल्यानेच त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत याच मुद्याचा उच्चार केल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Party Symbol Mashal also may freeze check details on 17 February 2023.

हॅशटॅग्स

#Shivsena Party Symbol Mashal(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x