15 January 2025 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

गतिमान जाहिरातबाजी सरकार! ST महामंडळाच्या बस बाहेर शिंदे-फडणवीस-मोदींची मार्केटिंग जाहिरात, आतमध्ये प्रवासी छत्री उघडून

ST Mahamandal Buses

Shinde Fadnavis Govt | राज्य एसटी महामंडळाच्या बसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात व्हायरल झाली होती. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र नंतर ते निलंबन मागे घेण्यात आले होते. शिंदे-फडणवीस सरकारने ST बसेसच्या मूळ समस्या दूर करण्यापेक्षा या ST महामंडळाच्या बसेसवर स्वतःची आणि मोदींची जाहीरबाजी करण्यावर मोठा पैसा खर्च करण्याचा सपाटा लावला आहे.

मार्च महिन्यात दुरवस्था झालेल्या व अक्षरश: खिळखिळी झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात व्हायरल झाली होती. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. विरोधकांकडून व राज्यातील सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर अखेर या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. भूम एसटी डेपोतील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन माघार घेत अखेर त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश भूम डेपो व्यवस्थापनाने दिले होते. जाहिराती स्वतःच्या आणि कारवाई कर्मचाऱ्यांवर असा अजब प्रकार शिंदे-फडणवीस सरकारने केला होता.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. खिडक्यांची व बसण्याची व्यवस्थाही नसलेल्या बसवर राज्य सरकारची जाहिरात असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची दखल घेत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार सडकून टीका केली होती.

मात्र मूळ समस्या सोडून जुनाट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि भूममधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा सरकारवर टीका करत सरकारची कृती म्हणजे आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी असा टोला लगावला होता. अजित पवार यांनी बसची दुरावस्था व त्यावर सरकारची जाहिरात याचे विदारक सत्य विधीमंडळात मांडल्यानंतर सरकारवर प्रचंड टीका झाली होती. दुरावस्था झालेल्या बसचा जाहिरातीसह फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

आता बसच्या दुरवस्थेचा अजून व्हिडिओ व्हायरल होतोय. सध्या पाऊस सुरु होईल जेमतेम एक दिवस झाला आहे. तो सुद्धा तुरळक प्रमाणात. अजून रिमझिम पाऊस सुरु झालेला नाही. मात्र ज्या एसटी बसेसच्या बाहेरील बाजूवर शिंदे-फडणवीस सरकार स्वतःची जाहिरातबाजी करत आहे त्याच बसेसची आतील दुरावस्था दाखवणारे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. या एसटी बसमध्ये प्रवासी बसले आहेत आणि तिकिटाचे पैसे मोजूनही प्रवाशांना भलताच मनस्ताप सहन करावा लागतोय. कारण पाऊस सुरु झाल्याने प्रवाशांना एसटी बसमध्ये सुद्धा छत्री उघडून बसावं लागतंय, कारण बस मध्ये पावसाच्या पाण्याची गळती होतं आहे. त्यामुळे एसटी बसच्या बाहेरील जाहिरातींवरील पैसा शिंदे-फडणवीस सरकारने एसटी बसच्या आतील समस्या सोडविण्यास वापरला तर प्रवाशांच्या समस्या सुटली किंवा कमी होतील.

News Title : ST Mahamandal Buses leaked viral video check details on 25 June 2023.

हॅशटॅग्स

#Rain Effect on ST Buses (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x