15 November 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?

State Political Crisis

CM Eknath Shinde | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबण्याची दाट शक्यता आहे. खरंतर सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर 4 ऑगस्टला सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे या आठवड्यात सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर ही सुनावणी पुढच्या आठवड्यावर ढकलण्यात आली होती.

प्रथम सुनावणी 8 ऑगस्टला असं सांगण्यात आलं होतं :
सुप्रीम कोर्टाने पुढच्या आठवड्यात सुनावणी होईल, असं सांगितल्यानंतर ही सुनावणी 8 ऑगस्टला होईल, असा कयास बांधला जात होता. पण आज समोर आलेल्या माहितीनुसार सत्तासंघर्षाच्या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सोमवारी नाही तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणखी प्रचंड लांबण्याची शक्यता आहे.

दर आठवड्याच्या शुक्रवारी :
दर आठवड्यात शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावणींविषयी माहिती देण्यात येते. त्यानुसार आजही माहिती जारी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटनुसार, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीची संभाव्य तारीख 12 ऑगस्ट आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष आणखी पुढे लांबणार आहे. कारण या याचिकांवर निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे.

शिंदे – फडणवीसांची अडचण थांबेना :
तसेच सुप्रीम कोर्टातील निर्णयाला घाबरूनच एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. अशी टीकाही सध्या विरोधकांकडून होत आहे, मात्र आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू असे वारंवार एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे, मात्र सध्या तरी हा मुहूर्त अजून उजाडलेला नाहीये, अजित पवारही सध्या विस्तारावरून आक्रमक झाले आहेत, तर राज्यातील सचिवांवर सुद्धा टीका होऊ लागली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: State Political Crisis hearing in supreme court of India check details 06 August 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x