21 November 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

महाराष्ट्र सरकार नपुंसक! ते काहीही करत नाही, धर्माचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणे बंद केले पाहिजे - सुप्रीम कोर्ट

Supreme Court on Shinde Fadnavis Govt

Supreme Court on Shinde Fadnavis Govt | मागील काही दिवसांपूर्वी मुंबईत शहरात झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी मोठे वक्तव्य केले. न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीही करत नाही. ते शांत आहेत, म्हणूनच सर्व काही घडत आहे. राजकारण आणि धर्म हे वेगवेगळे ठेवण्याची वेळ आली आहे. तसे झाले तरच कटुता संपुष्टात येईल. राजकारण्यांनी धर्माचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणे आता बंद केले पाहिजे तरच धार्मिक मुद्द्यांवरून असलेले सर्व वाद थांबतील. आम्ही केवळ सांगू शकतो. ऐकायचं की नाही ते तुम्हीच ठरवणार आहात,’ असेही ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारला दणका
अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी ‘सर तन से जुदा’ या विधानाबाबत न्यायालयाला माहिती दिली. त्यावर बोलताना न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले, “द्वेषयुक्त भाषा किंवा विधाने हे एक दुष्टचक्र आहे. त्यातून बाहेर पडणे कठीण आहे कारण एकाने काही तरी विधान केले की त्यावर दुसरे लोक प्रतिक्रिया देत राहतात. पण या सगळ्या बेजबाबदार गोष्टी आणि वक्तव्ये थांबवायची असतील तर सरकारनेच एक कारवाईची प्रक्रिया सुरू करायला हवी. पण राज्याचे सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. ते शांत आहे, म्हणूनच हे सर्व काही घडत आहे,” असे न्यायमूर्तींनी शिंदे-फडणवीस सरकारला कार्यपद्धतीवरून सुनावले.

सामान्य जनतेपासून सर्वच थरातून शी-थू!
दरम्यान, समाज माध्यमांवर देखील नेटिझन्सनी शिंदे-फडणवीस सरकारवर शी-थू अशी टीका सुरु केली आहे! कोर्टाने सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यानंतर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायालयाने यापूर्वी कधीही सरकारला नपुंसक म्हटलं नव्हतं. यातून सरकारचा कारभार काशाप्रकारने चालला आहे हे कळतं. कोर्टाच्या टिपणीनंतर सरकारने बैठक घेऊन चर्चा करावी असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले की सरकारला खरं बोललं की राग येतो. यंत्रणांनी कोणाच्याही दबावात काम करू नये.

संजय राऊत यांची देखील जळजळीत टीका
कोर्टाच्या या ताशेऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार नपुंसक आहे. हे आम्ही म्हणत नाही. यामागे आम्ही नाही. कोर्ट म्हणत आहे. यापूर्वी जनता म्हणत होती. त्यामुळे आता तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर येईल अशी आशा आहे, असं सांगतानाच सत्यमेव जयते यालाच म्हणतात, असं संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Supreme Court on Shinde Fadnavis Govt check details on 30 March 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x