18 November 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

नजर हटी, दुर्घटना घटी! महाराष्ट्रात ढवळाढवळ अन तेलंगणाकडे दुर्लक्ष? BRS'चे माजी मंत्री, माजी खासदार, आमदारांसह 12 नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Telangana CM KCR

Telangana BRS Party | तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना आज मोठा धक्का बसला जेव्हा त्यांचे डझनहून अधिक माजी मंत्री, माजी खासदार आणि माजी आमदारांनी बीआरएस पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोमवारी या नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातूनही गेली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे तेलंगणात देखील कर्नाटकप्रमाणे काँग्रेसचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश केला आहे. निवडणुका तोंडाजवळ असताना आणि कोणताही संघटन नसताना हा प्रयोग म्हणजे इतर पक्षात संधी नसलेल्यांसाठी बातम्यांमध्ये येण्यापुरता मर्यादित आहे. मात्र, काँग्रेसला के. चंद्रशेखर राव यांचा राजकारणाने काही फरक पडत नेसून त्यांनी थेट तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि बीआरएस यांच्यातच थेट सामना होणार असून येथे भाजप नगण्य आहे.

तेलंगणात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घासल्याने बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी खासदार पोंगुलेट्टी श्रीनिवास रेड्डी, माजी मंत्री सपल्ली कृष्ण राव, माजी आमदार पान्यम व्यंकटेश्वरलू, कोरम कनकैया आणि कोटा राम बाबू या बड्या नेत्यांचा समावेश आहे. बीआरएसचे एमएलसी नरसा रेड्डी यांचे पुत्र राकेश रेड्डी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे के. चंद्रशेखर राव यांची मोठी राजकीय अडचण झाली आहे.

तेलंगणात देखील काँग्रेसचे वारे वाहू लागल्याने के. चंद्रशेखर राव हे विरोधकांच्या बैठकीला अनुपस्थित होते असं म्हटलं जातंय. भारत राष्ट्र समितीने (बीएसआर) पाटण्यात विरोधी पक्षांच्या महासभेला अनुपस्थित राहिल्यानंतर काही दिवसांनी या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती, ज्यात १५ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते, परंतु केसीआर यांनी त्या बैठकीतून माघार घेतली होती. विरोधकांच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल आपल्या पक्षाचे समर्थन करताना मुख्यमंत्री केसीआर यांचे मंत्री पुत्र केटीआर म्हणाले होते की, विरोधी पक्षांना “कोणालातरी सत्तेतून काढून टाकण्याचे वेड” लागले आहे.

भाजपविरोधातील लढाई देशासमोरील प्रमुख आव्हानांवर असली पाहिजे, असे ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. बीआरएस २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार असून मोठ्या संख्येने जागा जिंकण्याचे ध्येय ठेवून प्रभावी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल, असे संकेतही केटीआर यांनी दिले.

News Title : Telangana 12- top leaders joins congress party before assembly Election check details on 26 June 2023.

हॅशटॅग्स

#Telangana CM KCR(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x