15 January 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

निवडणुकीपूर्वी ठाण्यातील 'राजकीय ठेकेदार' केवळ मुंबई महापालिकेतील 'ED' राजकारणात व्यस्त, तिकडे ठाण्यातील इस्पितळात मृत्यूचं तांडव

Eknath Shinde

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital | एकाबाजूला राज्यातील राजकीय परिस्थतीला कारणीभूत ठरलेल्या ठाण्यातील ‘राजकीय ठेकेदार’ सध्या मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ‘ED’ मार्गे पक्षविस्तारात व्यस्त झालेले असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतील ‘इस्पितळ ठेकेदारी’ समोर आली आहे आणि याचे बळी ठरत आहेत ठाण्यातील रुग्ण असंच एकूण चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेक घरांमध्ये अश्रुंचे बांध फुटले आहेत.

मात्र याबाबत अद्याप रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. आमदार जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा रुग्णालयात धाव घेत प्राशसनाला धारेवर धरले होते. त्यानंतर गेल्या 12 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुन्हा एकदा कळवा रुग्णालय चर्चेत आला आहे.

ठाण्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय नुतनीकरणासाठी दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे.अशातच अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते.

रुग्णालयाची जवाबदारी ढकलण्यासाठी कारणं

कळवा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. पावसामुळे साथीचे आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. परिणामी प्रशासनावर ताण येत आहे. रुग्णांना वेळेवर अटेंड करणं कठिण होत आहे. त्यातच अनेक रुग्ण गंभीर आजाराचे आहेत. काही रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण जातं. प्रत्येक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पण मनुष्यबळाच्या अभावी प्रत्येक रुग्णाला वेळ देता येत नसल्याने उपचारा अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण

या रुग्णालयाची क्षमता 1500 रुग्णांची आहे. पण रुग्णालयात रोज क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. काही वेळा तर एका बेडवर दोन रुग्णांना झोपवावं लागत आहे. साथीच्या आजारामुळे ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यातच डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचंही सांगण्यात येतं.

News Title : Thane 17 patients died in Chhatrapati Shivaji Maharaj hospital in Kalwa 13 August 2023.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x