28 April 2025 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट
x

मुस्लिमांच्या इफ्तार पार्टीतील जनाब फडणवीस आणि संभाजीनगरच्या उर्दू पोश्टरवरील जनाब शिंदेंची हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर टीका

Uddhav Balasaheb Thackeray

Uddhav Thackeray Rally at Malegaon | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात सभा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सत्तातरानंतर प्रथमच मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा होतेय. त्यामुळे या सभेकडे संपुर्ण महाराष्ट्रासह राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सभेपुर्वीच मालेगावचे वातावरण चांगलेच तापले आहे.

शिंदे गटातील मंत्री दादा भूसेंना देखील त्या प्रकरणाचा हिशेब तयार ठेवण्याचे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभेपुर्वीच वातावरण तापले आहे. मात्र आगामी काळात या सभेचे परिणाम संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर उमटतील अशी देखील शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

मालेगाव भगवामय
या सभेच्या ठिकाणी संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच सभेच्या आसपासच्या परिसरात आणि मालेगावच्या प्रमुख भागात, चौकात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. दरम्यान, मालेगाव मध्ये या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी ठाकरे गटाच्या वतीने उर्दूमध्ये बॅनर मालेगावच्या चौका चौकात लावण्यात आलेले आहेत.

जनाब देवेंद्र फडणवीस’ असे फलक
सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि त्यामुळे या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी विशेष प्रयोजन केले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावले असून उर्दू भाषेतून या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, याच मुद्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवत ‘जनाब’ या शब्दाचा उल्लेख केला. मात्र हेच देवंद्र फडणवीस मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम समाजच्या इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावतात तेव्हा देखील जागो जागी ‘जनाब देवेंद्र फडणवीस’ असे फलक झळकत असतात याची नेटिझन्स आठवण करून देतं आहेत. तसेच शिंदेंच्या शिवसेनेतील विवादित कट्टर मुस्लिम नेते अब्दुल सत्तार हे तर संपूर्ण संभाजीनगर’मध्ये उर्दू फलकांवर शिंदेंना असेच ओळखतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे बेगडी राजकीय चेहरे समोर आल्याची चर्चा समाज माध्यमांवर जोर धरत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uddhav Balasaheb Thackeray Shivena rally at Malegaon check details on 26 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Uddhav Balasaheb Thackeray(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony