15 November 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

गडकरीजी! राणे कुटुंब ते अमृता फडणवीस यांनी वापरलेली भाषा तुम्हाला कधी दिसली नाही का? नेटिझन्सनी गडकरींना पुरावे देत सुनावले

Union Minister Nitin Gadkari

Nitin Gadkari | शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका केली. अत्यंत बोचऱ्या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. असं असताना आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पक्षातील नेत्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावलं आहे.

उद्धव ठाकरेंनी नेमकी काय टीका केली?

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्या बालेकिल्ल्यातूनच जोरदार हल्ला चढवला. ‘देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची अवस्था आता विचित्रच झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झालंय काय नाही, काहीतरी झालंय नक्की पण सांगण्यासारखं नाही.’ अशी खिल्ली ठाकरेंनी उडवत फडणवीसांची एक ऑडीओ क्लिपच सभेत ऐकवली. या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘एकवेळ अविवाहित राहणे पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही.’ ही क्लिप लावल्यानंतर ठाकरेंनी फडणवीसांच्या त्या भूमिकेची देखील आठवण करून दिली.

गडकरी नेमकं काय म्हणाले?

‘श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नेटिझन्सनी गडकरींना पुरावे देत झापले

दरम्यान, गडकरींच्या प्रतिक्रियेवर नेटिझन्स त्यांना भाजप नेत्यांचे सर्व पुरावे देत सुनावत आहेत. यामध्ये नितेश राणे, निलेश राणे, अमृता फडणवीस यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांची वक्तव्य ट्विट करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता गडकरींनी आधी भाजप नेत्यांच्या तोंडाला आवर घालावा असं नेटिझन्स सांगताना त्यांना भाजपचा इतिहास दाखविण्यास सुरुवात केली आहे.

News Title : Union Minister Nitin Gadkari Tweet on Uddhav Thackeray Netizens Angry on Gadkari check details on 11 July 2023.

हॅशटॅग्स

#Union minister Nitin Gadkari(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x