18 November 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

उद्धव ठाकरेंच्या मागे लागलेल्या भाजपाला देशभर पणवती मागे लागली, यूपीत ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षात उभी फूट, सपा'ला फायदा

Uttar Pradesh Om Prakash Rajbhar

Uttar Pradesh Politics | सुहेलदेव भारतीय समाज पक्षात (एसबीएसपी) ओम प्रकाश राजभर यांच्याविरोधात मोठी बंडखोरी झाली आहे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेंद्र राजभर यांनी सोमवारी डझनभर पदाधिकाऱ्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी ओमप्रकाश राजभर यांच्यावर पक्षाच्या मिशनपासून फारकत घेतल्याचा आरोप केला.

महेंद्र राजभर हे दीर्घकाळापासून पक्षात :
राजभर यांच्या बंडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एसबीएसपी नेते अरुण राजभर यांनी एका खासगी चॅनेलला सांगितले की, एसबीएसपी हे प्रयोगशाळेसारखे आहे. इथे शिकल्यानंतर जेव्हा लोक मोठी डिग्री घेण्याची इच्छा बाळगतात, तेव्हा अशा गोष्टी समोर येतात. ते म्हणाले, महेंद्र राजभर हे दीर्घकाळापासून पक्षात आहेत. आज अचानक काय झालं? मात्र, एसबीएसपी कार्यकर्त्यांचा आपण आदर करतो, असेही ते म्हणाले. त्यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ओम प्रकाश राजभर यांच्यावर गंभीर आरोप :
मऊ येथील एका प्लाझामध्ये पत्रकारांशी बोलताना राजभर यांनी असा आरोप केला की, एसबीएसपीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर हे केवळ पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. २० वर्षांपूर्वी २७ ऑक्टोबर २००२ रोजी सर्वांच्या उपस्थितीत या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

३० वरिष्ठ आणि पहिल्या फळीतील नेत्यांचे राजीनामे :
त्यावेळी गरीब, दलित, मजूर आणि वंचित समाजाची उन्नती करणे हे पक्षाचे ध्येय होते, तर तेव्हापासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या रक्ताने आणि घामाने स्थापन केलेल्या पक्षाचा वापर केवळ पैसे गोळा करण्यासाठी केला. त्यांच्या राजकारणामुळे दुखावलेल्या प्रदेश सरचिटणीस अर्जुन चौहान, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अवधेश राजभर आणि डझनभर सहकाऱ्यांनी एसबीएसपीचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ओपी राजभर सध्या ‘सावधान यात्रा’ करत आहेत :
त्याचबरोबर ओपी राजभर सध्या ‘सावधान यात्रा’ करत आहेत. या यात्रेची सुरुवात त्यांनी वाराणसीपासून केली. त्याचबरोबर बिहारची राजधानी पटनामध्ये त्याचा प्रवास संपणार आहे. अखिलेश यादव यांच्या पदयात्रेनंतर एसबीएसपीच्या या यात्रेची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी अखिलेश यादव यांच्यापासून लोकांना सावध करण्याबद्दल सांगितले होते. मात्र त्यावेळीच त्यांच्या पक्षात फूट पडली असून सर्व वरिष्ठ नेते समाजवादी पक्षाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे हा भाजपाला देखील मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uttar Pradesh Om Prakash Rajbhar party in danger check details 05 September 2022.

हॅशटॅग्स

#Uttar Pradesh Om Prakash Rajbhar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x