25 November 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं

Vande Mataram

Vande Mataram | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज झाले. यामध्ये सांस्कृतिक खात्याची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरमुनगंटीवार यांच्या खांद्यावर पडली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे जबाबदारी येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीयस्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत अशी माहिती दिली.

१८०० मध्ये टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतआलो आहोत. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरकेला. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या आवाहनाला पंकजा मुंडे यांनी समर्थन दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘अमित शहा यांच्या कार्यालयात फोन केला की हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलले जाते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातही फोन केल्यावर फक्त वंदे मातरम् बोलतात, ते ऐकायलाही छान वाटत. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो. ज्या गोष्टी बोलल्यामुळे अभिमान वाटतो त्या म्हणायला हरकत नसावी, असं म्हणत पंकजा यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे.

वादाचे मुद्दे हेडलाईनमध्ये – भाजपाच्या रणनीतीचा इतिहास :
दरम्यान, या मुद्यावरून विरोधकांमधील कोणी नकारात्मक टिपणी करत का यावर देखील भाजप नेत्यांचं लक्ष असावं असं प्रथमदर्शनी पाहायला मिळतंय. एबीपी माझावरील याच विषयावरील एका चर्चेत काँग्रेसचे नेते राजू वाघमारे आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जी आरडाओरडीची संधी साधली त्यातून तो प्रत्यय आला. वास्तविक सामान्य जनतेच्या मूळ मुद्द्यांना बगल देऊन इतर धार्मिक, जातीय आणि वादाचे मुद्दे हेडलाईनमध्ये ठेवणं असा भाजपाच्या रणनीतीचा इतिहास आणि अनुभव आता संपूर्ण देशाला आला आहे. त्यामुळे आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी सुद्धा या विषयावर वाद न करता अभिमानाने ‘वंदे मातरम’ असं म्हणतच भाजपच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांवर महागाई, बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून प्रश्नांचा भडीमार करून त्यांना त्यांच्याच कात्रीत पकडणं गरजेचं आहे.

अजित पवार काय म्हणाले :
राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर हॅलोऐवजी आता वंदे मातरम बोलावं यासंदर्भात केलेल्या विधानाचाही अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. “महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कुणी कुणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कुणी जय हरी म्हणतो. आता मध्येच काय यांनी वंदे मातरम काढलं. आमचा वंदे मातरम म्हणण्याला विरोध नाही. पण हा विषय सध्या महत्वाचा आहे का? महागाईवर बोला, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे त्याचं काय करणार आहात? यावर बोलायला हवं”, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vande Mataram in Maharashtra Govt office check details here 16 August 2022.

हॅशटॅग्स

#Vande Mataram(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x