18 November 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

बारसू प्रकल्पातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोकणाच्या निसर्गाची वाट लावू नये, या प्रकल्पाला आमचा विरोध - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

VBA Chief Prakash Ambedkar | कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर अनेकांना अटक झाली असून काही प्रमाणात पोलीस बळाचाही वापर झाल्याचं समोर आलं आहे.

स्थानिकांकडून आंदोलन
रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्यानंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच ठेण्यात आलं आहे. अनेक आंदोलक सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या मांडून होते. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे.

कोकणातील निसर्ग, नद्या, समुद्र, फळबागा धोक्यात
या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग, समुद्र, फळबागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केलीय. कोकणातील जैवविविधताही या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून यामुळे प्रकल्पाला विरोध केला जात आहे.

यावर बारसू रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. कोकणातील बारसू प्रकल्पाला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही विरोध होता. एन्रॉन घालवण्यामध्ये आमची भूमिका मोठी होती. एकनाथ शिंदेंना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका, असं ते म्हणाले.

कोकणात 95 टक्के ऑक्सिजन म्हणून कोकण प्रदूषणमुक्त
केंद्रातून फोन आले की यांच्या भूमिका बदलतात. कोकणात 95 टक्के ऑक्सिजन आहे. तिथे फ्लोरा आणि फोना जन्माला येतो. प्रदूषणमुक्त परिसर असल्यामुळे हे होतं. तो परिसर तसाच राहायला हवा. राहिला कोकणातल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर अंतुले जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले की, मला पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करू शकतो. त्यांच्याच काळात गाव तिथे एसटी सुरू झालं. पण नंतर त्यांच्यावर गंडांतर आणून त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं.

इंडस्ट्री येऊन कोकणात रोजंदारी वाढेल असं नाही, तर कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं प्लॅनिंग करून व्यापार, छोटे उद्योग सुरू केले, तर तेलंगणाप्रमाणे कोकणातही लोकांचं उत्पन्न वाढेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VBA Chief Prakash Ambedkar opposed Barsu Refinery Project check details on 30 April 2023.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x