15 January 2025 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

VIDEO | नाशकात शिंदे समर्थक आ. सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक, कांदेनी गाडीतून पळ काढला

VIDEO

VIDEO | बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शंका उपस्थित केलीये.

एकना शिंदे यांच्या सुरक्षेवरून सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर काय केला आरोप?
“सकाळी साडेआठ वाजता शंभूराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला की, एकनाथ शिंदेंना सुरक्षा द्यायची नाही. मग एकनाथ शिंदे यांना सुरक्षा का दिली गेली नाही हा प्रश्न माझा आदित्य ठाकरेंना आहे,” असा सवाल सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केला.

शिवसैनिक आक्रमक:
दररम्यान, बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या आरोपानंतर नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांचं रुद्र रूप पाहून बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी तेथून गाडीत बसून पळ काढल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO Nashik Shivsanik gone aggressive against MLA Suhas Kande check details 22 July 2022.

हॅशटॅग्स

#MLA Suhas Kande(1)#VIDEO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x