27 January 2025 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
x

Video Viral | महाविकास आघाडीला 'अजगर' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी 'नाटकी माणूस' म्हटलं होतं

Video Viral

Video Viral | महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी हे बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही आक्रमक झाले आहेत. तसंच आदित्य ठाकरे, संजय राऊत या सगळ्यांकडूनही एकनाथ शिंदे यांच्यावर आणि निघून गेलेल्या बंडखोरांवर टीका करणं सुरू आहे. या टीकेला ट्विटच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?
प्रिय शिवसैनिकांनो, म.वि.आचा खेळ ओळखा. मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना सोडवण्यासाठी मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित.. आपला….एकनाथ संभाजी शिंदे

फडणवीसांनी काय म्हटले होते :
२०१५ मधील KDMC निवडणुकीवेळी तत्कालीन PWD मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेतच आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर राजीनामा दिला होता. अर्थात प्रत्यक्षात तसं पुढे घडलंच नाही. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत शिवसेनेला लक्ष करताना एकनाथ शिंदे यांना ‘नौटंकी माणूस’ असं म्हटलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral when Devendar Fadnavis was called Eknath Shinde as Nautanki Manus check details 26 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x