28 January 2025 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

उत्तर प्रदेश | गोरखपूरमध्ये एका बेडसाठी 100 वेटिंगवर, रुग्ण मृत्यूच्या प्रतीक्षेत | भीषण परिस्थिती

Uttar Pradesh Corona pandemic

गोरखपूर, २३ मे | देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशभरात 2 लाख 40 हजार 766 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. देशात 35 दिवसानंतर संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांच्या खाली आला. यापूर्वी, 16 एप्रिलला 2 लाख 34 हजार 2 रुग्ण सापडले होते. दरम्यान, या महामारीमुळे मृत्यू होण्याचा आकडा चिंताजनक आहे. शनिवारी कोरोनामुळे 3,736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थितीमुळे राज्यात आरोग्य व्यवस्थेची पूर्णपणे पोलखोल झाली असून सामान्य लोकं हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यात आता अजून काही गोष्टी समोर येतं आहेत ज्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सिद्ध झालाय. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशात जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत आलेल्या दाहक अनुभवाचे ऑडिओ-व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातून दुसऱ्या लाटेतील धक्कादायक अनुभव ऐकायला मिळत आहेत. गोरखपूरचे जिल्हाधिकारी के. विजयेन्द्र पाण्डियन यांनीही असाच एक अनुभव शेअर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेला हा अनुभव ऐकून भल्या भल्यांची झोप उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे जिल्हाधिकारी के. विजयेंद्र पाण्डियन यांचा एक ऑडिओ व्हायरल होत असून, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काही गोष्टींची जाहीररित्या कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट फारच भयावह होती. एकवेळ अशी आली होती की, एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते आणि रुग्णांच्या मृत्यूची वाट पाहत होते, असे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असताना लावण्यात आलेला लॉकडाऊन हा केवळ १० दिवसांत उठवावा लागला. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात आला. अर्थव्यवस्थाही सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा नगरसेवकांनी उत्तम काम केले. कोरोना आला आणि गेला. मात्र, कोरोनाचे प्रकार घातक असून, त्याचा संसर्ग वेगाने होत असल्याचे जिल्हाधिकारी पाण्डियन यांनी सांगितले.

 

News English Summary: Collector of Gorakhpur K. An audio of Vijayendra Pandian is going viral and while speaking on a program, he is said to have publicly confessed some things. The second wave of corona was very frightening. At one point, 100 people were waiting for a bed and waiting for the patient to die, saying they were in tears.

News English Title: 100 Covid patients were waiting for a bed said Collector of Gorakhpur K. Vijayendra Pandian news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x