24 December 2024 9:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

युपी-बिहारमध्ये कोरोनाचा कहर | स्मशान भूमीत वेटिंग, बिहार व यूपीत गंगा नदीत १५० कोविड प्रेतं फेकली

India corona pandemic

पाटणा, १० मे | सलग चार दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येत पाचव्या दिवशी काहीशी घट झाली आहे. देशात मागील २४ तासात ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. मागील चार दिवसांनंतर पहिल्यांदा इतकी कमी रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांसह मृतांचा आकडाही खाली आला आहे. मागील २४ तासादरम्यान ३ हजार ७४७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मागील २४ तासात ३ लाख ५३ हजार ५८० जण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित आणि कोरोना मुक्त होणाऱ्यांच्या संख्येतील अंतर हे १ लाख राहत होते. परंतु आता ते १० हजारांनी कमी झाले आहे. देशात सध्या सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ४१ हजार ३६८ झाली आहे.

देशातील उत्तरेकडील राज्य देखोल कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मात्र स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.

 

News English Summary: Over 100 dead bodies of reported COVID fatalities dumped in Ganga in Bihar. Similar things reported in Uttar Pradesh. This must be the top news worldwide & International Media must highlight. The incompetence of PM Modi & his minion CMs is a threat to GLOBAL HEALTH said congress leader Srivatsa.

News English Title: Over 100 dead bodies of reported COVID fatalities dumped in Ganga in Bihar news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x