दिल्लीत आजपर्यंत डॉक्टर, नर्सेससाहित १,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली, २१ जून : जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, देशात सध्या १ लाख ६९ हजार ४५१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
मात्र राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. असं असतानाच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांकडे आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मार्चपासून आतापर्यंत दिल्लीत डॉक्टर आणि नर्स अशा १,२०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे कोरोना योद्धे कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र राजधानीत निर्माण झालं आहे.
दिल्ली सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी दिल्लीतील ९ मोठी रुग्णालये कोरोनाची सेंटर बनवली आहेत. येथे फक्त कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रुग्णालयांमधील १,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. यात खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. दिल्लीत आतापर्यंत ३१३ परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचं परिचारिकांच्या संघटनेनं म्हटलं आहे. दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या ५३ हजार ११६ झाली असून त्यापैकी २७ हजार ५१२ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २३ हजार ५६९ जण कोरोनामुक्त झाले असून २,०३५ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहेत.
News English Summary: Corona virus is spreading in the capital Delhi. At the same time, it is shocking that the health department is neglecting the doctors and health workers treating corona patients. As many as 1,200 people, including doctors and nurses, have been infected with the corona in Delhi since March.
News English Title: 1200 people including doctors and nurses have been infected with the corona in Delhi since March News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN