23 February 2025 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आम्हाला धमक्या | युपीच्या पोलिसांवर आमचा विश्वास नाही | पीडितेच्या कुटुंबाचा आरोप

300 Police Personnel, Lockdown, Entire Village In Hathras

लखनऊ, ३ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाचं वातावरण असताना पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उद्रेक वाढताना दिसत आहे. हाथरसला उत्तर प्रदेश सरकारने छावणीचं स्वरुप दिलं असून तब्बल ३०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गावात सात पोलीस वाहनं आणि पाच बॅरिकेट्सही उभे केले आहेत.

हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच २९ सप्टेंबरला तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी बळजबरीने तरुणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ सरकारने गावाला छावणीचं स्वरुप दिलं असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.

मात्र टीकेची झोड उठल्यानंतर योगी सरकारने माध्यमांना परवानगी दिल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. माझ्या बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला आहे. प्रशासनाकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आम्हाला कुणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, अशी तंबी देखील दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. त्याचप्रमाणे गावातल्या काही जणांची भीती वाटत आहे. गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील, असा खळबळजनक आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे.

आम्हाला धमकाविण्यात आले. घरातील पुरुषांना मारहाण करण्यात आली. आमच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. पोलीस आणि जिल्हा प्रशासन धमकी देत होते. पैसै घेऊन प्रकरण मागे घेण्यास सांगत होते, असा दावा देखील पीडित मुलीच्या काकीने केला आहे.

 

News English Summary: My sister has been gang-raped. The administration is trying to suppress the truth. The victim’s brother also alleged that we should not try to contact anyone. Similarly, some people in the village are scared. The victim’s family has also made a sensational allegation that the villagers will kill us.

News English Title: 300 Police Personnel Lockdown Grieving Family Entire Village In Hathras Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x