पश्चिम बंगाल | भाजपचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर | मोदी-शहांची डोकेदुखी वाढणार
कोलकाता, ०४ जून | प. बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. परंतु, तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठं भगदाड पडू शकतं.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीआधी कमळ हाती घेतलं. सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता यांनी राज्याची सत्ता राखली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल ३३ आमदार तृणमूलमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी तृणमूलचे ३३ आमदार भारतीय जनता पक्षामध्ये गेले होते. आता तितकेच आमदार पुन्हा तृणमूलमध्ये येऊ शकतात.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सहकारी राहिलेले रॉय निवडणूक निकालापासून शांत आहेत. त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉयनं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे रॉयदेखील पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. तशी चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
News English Summary: Rapid political developments are taking place in West Bengal. Before the Assembly elections, many leaders and MLAs from the ruling Trinamool Congress joined the Bharatiya Janata Party. The Bharatiya Janata Party was starting to come in strongly. However, with the Trinamool winning more than 200 seats, the Bharatiya Janata Party (BJP) is likely to face a major rift. It is reported that 33 MLAs of Bharatiya Janata Party are on the path of Trinamool.
News English Title: 33 MLAs of Bharatiya Janata Party are on the path of Trinamool congress in West Bengal news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो