5 February 2025 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

बिहारला वादळाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू

Bihar, lightning strikes, Storm

पाटणा, २५ जून : बिहारमध्ये गुरुवारी आलेल्या वादळाने राज्यात थैमान घातलं असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यात विविध भागात वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक १३ बळी हे गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बिहारमध्ये गुरूवारी वादळामुळे प्रचंड जीवितहानी झाली आहे. वादळादरम्यान राज्यात ठिकठिकाणी विजा कोसळून तब्बल ८३ नागरिक मरण पावले आहेत. यात सर्वाधिक वीजबळी गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. गोपालगंजमध्ये वीज कोसळून १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मधुबनी व नबादा जिल्ह्यात प्रत्येकी ८ लोक मरण पावले आहेत.

बिहारमधील आठ जिल्ह्यामध्ये ५ वीजबळी गेले आहेत. यात गोपालगंज, पूर्वी, चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी व नबादा यांचा समावेश आहे. मृतांच्या आकडा समोर आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. वीज कोसळून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे.

 

News English Summary: The storm that hit Bihar on Thursday has taken a heavy toll on the state. As many as 83 people have been killed in lightning strikes in various parts of the state. The highest number of 13 victims have gone to Gopalganj district.

News English Title: 83 people have been killed in lightning strikes in various parts of the Bihar state News latest Updates.

हॅशटॅग्स

#Bihar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x