28 January 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल कोरोनाचं संकट | शास्रज्ञांच्या समितीचा दावा

A Government, Appointed Scientific Committee, Covid 19, Decline February 2021

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर : एकाबाजूला ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर आता भारतात रशियाचीही लस दिली जाणार आहे. Sputnik V लशीचं भारतात ट्रायल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.

रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने Sputnik V ही लस तयार केली आहे. रशियामध्ये सध्या या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. भारतातही या लशीचं ट्रायल करण्यासाठी भारताच्या डॉ. रेड्डीज कंपनीने रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी (RDIF-Russian Direct Investment Fund) करार केला आहे.

भारतात या लशीचं ट्रायल करण्यासाठी डॉ. रेड्डीजने डीजीसीआयकडे अर्ज केला होता. डीजीसीयीआने सुरुवातीला परवानगी दिली नाही. त्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा अर्ज केला आणि आता या लशीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

दुसरीकडे, फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल. फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर या समितीने असाही दावा केला आहे की भारतात करोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत.

सध्याच्या घडीला भारतात करोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे. सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. या समितीने आणखी एक दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन लागू केला नसता तर देशभरात करोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.

 

News English Summary: A government-appointed scientific committee has said the Covid-19 epidemic seems to have peaked and is now on the decline, and is likely to run its course by February next year. The committee, headed by Professor M Vidyasagar of IIT Hyderabad, has used computer models to map the trajectory of the epidemic in the country. Its key finding has been that the disease is likely to have peaked in the middle of September, and the total number of infections in India is unlikely to exceed 106 lakh (10.6 million). So far, 75 lakh people in India have been infected, of which nearly 66 lakh have recovered.

News English Title: A Government Appointed Scientific Committee Has Said Covid 19 Epidemic Seems To Have Decline February 2021 News updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x