13 January 2025 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांकडून सामूहिक बलात्कार

Rape in Rajasthan

जयपूर: देशात रोज दोन तीन सामूहिक बलात्काराच्या घडत असल्याचं दिसत आहे. अक्षरशः देशभरात विकृत नराधमांच्या वासनेमुळे अनेक महिला-मुलींची आयुष्य उध्वस्त होतं आहेत. दुसरीकडे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना देखील या विषयांचं गांभीर्य कोणीही मांडताना दिसत नाही. मात्र या घटना अधिकच वाढत असल्याचं मागील आठवडाभरातील घटनाक्रमाने निदर्शनास येतं आहे. सदर घटनेची माहिती स्वतः स्थानिक पोलीस प्रशासनाने अधिकृतपणे दिली आहे.

तत्पूर्वी, सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडली. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास पाच तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. परंतु, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (UNNAO: Four people have been arrested in connection with the case, main accused Shivam Trivedi is still absconding)

पीडिता आज पहाटे ४ वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे.

एकाबाजूला लेकीचं जगणंच असल्या हैवानांपुढे कठीण झालेलं असताना देश पातळीवरील सरकार यावर कोणताही तातडीने निर्णय घेऊन उपाय योजना आखण्याची धमक दाखवताना दिसत नाही. केवळ राजकीय फायद्यांसाठी उठसूट सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या भाजप सरकारला क्रूर बलात्काऱ्यांना तातडीने धडा शिकवता येईल असा कोणताही कायदा करण्याची धमक नाही. त्याच मूळ कारण याच्या पक्षातीलच अनेक नेते मंडळी बलात्काराच्या आरोपाखाली आहेत आणि स्वतः भाजपचे वरिष्ठ नेतेच महिलांसंबंधित गुन्ह्यात सामील असणाऱ्या नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. दोन दिवस आधी झारखंडच्या निवडणुकीसाठी स्वतः मोदींनी ज्या उमेदवाराचा प्रचार केला ती व्यक्ती एका महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोप आहे आणि त्यासंबंधित वृत्त सर्वत्र फोटोसहित प्रसिद्ध झाली आहेत.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x