22 December 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

BREAKING | झारखंड आमदार खरेदी प्रकरण | दिल्लीतील फुटेजनुसार बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांशी बैठक

Chandrashekhar Bawankule

मुंबई, २८ जुलै | झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.

दरम्यान, झारखंड सरकार पाडण्याचा कट आणि आमदारांच्या खरेदी प्रकरणात झारखंड पोलिसांच्या हाती मंगळवारी महत्त्वाचे धागेदोरे लागले. झारखंडचे तीन आमदार काँग्रेसचे इरफान अन्सारी, उमाशंकर अकेला आणि अपक्ष आमदार अमित यादव यांची १५ जुलै रोजी दिल्लीतील द्वारका भागातील हॉटेल विवांतामध्ये महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि व्यावसायिक जयकुमार बेलखेडे यांच्यासोबत १५ मिनिटे बैठक झाली.

या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज रांची पोलिसांना मिळाले आहे. झारखंडमधील खलारीचे पोलिस उपअधीक्षक अनिमेष नैथानी यांच्या नेतृत्वाखालील पथक दिल्लीत तपास करीत आहे. या पथकाला हे फुटेज मिळाले आहे. यात दिल्लीला गेलेले झारखंडचे तीन आमदार, अटकेत असलेला ठेकेदार अभिषेक दुबे, अमितकुमार सिंह आणि निवारण महतो हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसतात. याशिवाय हॉटेलमध्ये झारखंडचे तीन आमदार, महाराष्ट्रातील दोन नेते आणि व्यावसायिक व तीन आरोपींच्या बैठकीचे क्षणही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीनंतर हे सर्व दोन अलिशान गाड्यांमधून दुसऱ्या नेत्यांच्या भेटीसाठी बाहेर पडले. अटकेत असलेल्या आरोपींनीही पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये दोन गाड्यांचा उल्लेख केला आहे. इंडिगोच्या विमानाने ते दिल्लीला पोहोचल्यावर विमानतळावर दोन गाड्या तैनात होत्या. यापैकी इनोव्हामध्ये तीन आमदार आणि स्कॉर्पिओमध्ये तीन आरोपी हॉटेल विवांतामध्ये गेले होते. तर बावनकुळे आणि चरणसिंग यांना घेऊन महाराष्ट्रातील व्यावसायिक जयकुमार बेलखेडे हॉटेलमध्ये आले होते. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झारखंडचे तीन आमदार दिल्लीतील बड्या केंद्रीय नेत्याच्या निवासस्थानी गेले होते. तथापि तिथे केवळ औपचारिक नमस्कार वगैरे झाल्यानंतर सर्व परतले, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

हॉटेल ली लॅकच्या तीन खोल्यांची ४ दिवसांची ऑनलाइन बुकिंग:
एक्सपीडिया अॅपवरुन हॉटेल ली लॅकमधील ४ रुम्स बुक करण्यात आल्या होत्या. ही बुकींग २१ ते २४ जुलैसाठी होती. मुंबईहून गेलेले आशुतोष ठक्कर, मोहित भारतीय आणि अनिल यादव यांनी २१ जुलै रोज हॉटेल लीलॅकमध्ये चेक इन केले होते. ठक्कर खोली क्र.३०७, मोहित भारतीय खोली क्र.३१०, जय बेलखेडे खोली क्र.४०७ आणि अनिल यादव खोली क्र. ६११ मध्ये थांबले होते. परंतु २२ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता पोलिस छापा टाकण्यासाठी पोहोचण्यापूर्वी २० मिनीटे अगोदर हे सर्व हॉटेलमधून पसार झाले.

सीबीआय चौकशी करा, रांची उच्च न्यायालयात याचिका दाखल:
रांचीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज यादव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आमदार खरेदी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सन २००५ पासून झारखंड हे घोडेबाजाराचे केंद्र बनले आहे. झारखंडचे नेेते पैसे घेऊन जनतेची मते विकतात. ही मतदारांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत आयकर विभाग,सीबीआय,ईडी, रांची पोलिस आणि आमदार जयमंगलसिंह यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: According to footage from Delhi Jharkhand MLAs meet BJP Leaders Chandrashekhar Bawankule am news updates.

हॅशटॅग्स

#Chandrashekhar Bawankule(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x