27 December 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

आमदार, खासदार खरेदीसाठी पैसा आहे, पण व्हेटिलेटर, इंजेक्शन, औषधोपचार यासाठी पैसा नाही - असीम सरोदे

Advocate Asim Sarode

मुंबई, २६ एप्रिल: भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत. मृतांची प्रत्यक्षातील संख्या सरकारी आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे. जगातील जवळपास निम्मे रुग्ण भारतात आढळत आहेत.

देशात दररोज लाखा पेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी बेड, रेडमेसीवीर, ऑक्सिजन बेड तसेच लस मिळणं कठीण होऊन बसलं आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश, राजधानी दिल्लीतही भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयांबाहेर अनेक रुग्ण ताटकळत उपचारासाठी वाट बघत आहेत. पण त्यांच्यापर्यंत डॉक्टर वेळेवर पोहोचू शकत नाहीयत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतोय. केंद्र सरकारचं आरोग्य खातं मोठी आर्थिक तरतूद करून रुग्ण सेवा वाढवण्यावर भर देण्याऐवजी पीएम केअरमधून तरतूद करून वेळ मारून घेतंय का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

दरम्यान, मागील काही काळात देशातील विविध राज्यांतील सरकार पडताना कसे घोडेबाजार केले गेले हे देशाने पहिले आहे. त्यालाच अनुसरून ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “आमदार, खासदार लगेच खरेदी करतात. कुणाला कितीही जागा मिळोत सरकार स्थापन करण्यासाठी लगेच खरेदी होते, पण व्हेटिलेटर, इंजेक्शन, औषधोपचार यासाठी पैसा नाही म्हणतात. ते व्यक्ती व तो राजकीय पक्ष कोणता?”.

 

News English Summary: In recent times, the country has seen for the first time how horses were traded during the fall of governments in various states. Accordingly, Advocate Asim Sarode has indirectly criticized the Modi government. “MLAs, MPs buy immediately. No matter how many seats one gets, one buys immediately to form a government, but there is no money for ventilators, injections, medical treatment. What is that person and that political party?”

News English Title: Advocate Asim Sarode slams Modi govt over current situation in India corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x