3 December 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

J&K ३७०: सकाळपासून जमिनी खरेदीचे मेसेज; म्हणून राजू पाटलांकडून अदानी-अंबानींच अभिनंदन?

Ambani, Adani, Raju Patil, Article 370, Jammu Kashmir

श्रीनगर : कलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

दरम्यान, केंद्रातून हा निर्णय येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी, ‘‘तुर्तास अदानी अंबानींचे अभिनंदन! बाकीच्यांचे सकारात्मक परिणाम आल्यावरच! जय हिंद!’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा हा निर्णय प्रसार माध्यमांकडे यायला उशीर झाला असला तरी काश्मीर मध्ये जमीन खरेदी करण्यासाठीचे प्रोमोशनल मेसेजेस सकाळी १० वाजण्याच्या आधीच सुरुवात झाल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. त्याचाच अप्रत्यक्ष संदर्भ देत राजू पाटील यांनी अदानी अंबानी यांच्या नावाने खोचक टोला लगावला आहे.

कलम ३७० रद्द झाल्यास जम्मू-काश्मीरला देण्यात येणारा विशेष दर्जा संपुष्टात येईल. त्यामुळेच कलम ३७० चा भाग असलेला ३५ अ कलमही रद्द होईल. या कलमानुसार इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करू शकत नव्हता. त्यामुळे आता हा कलम रद्द झाल्यास ही अट रद्द होईल. केंद्राने जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असेही हा प्रस्ताव मांडताना अमित शाह म्हणाले आहेत. त्यामुळेच आता जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित झाले तर कोणत्याही भारतीय नागरिकाला तेथे मालमत्ता खरेदी करता येणार आहे. याच मुद्द्यावर राजू पाटील यांनी बांधकाम आणि उद्योग व्यवसायात असणाऱ्या आणि भाजपाच्या निकटवर्तिय मानल्या जाणाऱ्या अदानी आणि अंबानी यांना लक्ष्य केलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x