18 November 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

VIDEO | CBSE परीक्षा रद्द | मोदींनी साधली मॅनेज मार्केटिंगची संधी? | चेहऱ्यावर हसूच हसू , एकाचे पालक म्हणाले...

CBSE exam

नवी दिल्ली, ०३ जून | मंगळवारी १ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील CBSE बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरात राज्य सरकारने देखील त्यांच्या राज्यातील बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. पण आता परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन कसं करणार आणि त्यांना गुण कशाच्या आधारावर देणार? हा यक्षप्रश्न सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सीबीएसईनं याआधीच दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत. त्यापाठोपाठ देशातील काही राज्यांनी देखील तसाच निर्णय घेतला असून महाराष्ट्रात देखील तशाच प्रकारचा निर्णय होणं अपेक्षित होता आणि तोही आज जाहीर झाला.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी वाराणसीतील डॉक्टरांशी ऑनलाईन संवाद साधताना भावुक होऊन अश्रू ढाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हसताना दिसले. कारण मोदींना कोणता क्षण कॅश करावा हे चांगलं कळतं आणि ते सर्वकाही नियोजनबद्ध करून मोकळे होतात. कारण ठरलं आहे CBSE परीक्षा रद्द करणं असंच म्हणावं लागेल. डीडी न्युजच्या मार्फत ठराविक वेळेतील क्लिप ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक मोदींची स्तुती करताना दिसत आहेत. त्यात एका विद्यार्थ्यांचे पालक म्हणाले की आम्हाला शाहरुख खानाला भेटून जेवढा आनंद झाला असेल तेवढा तुम्हाला भेटून झाला आहे. त्यातील एक पालक मोदीजी आम्ही तुमच्यासोबत आहोत असं बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी मोदींच्या चेहऱ्यवरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहेत. एकूण निरीक्षण केल्यास संबंधित ऑनलाईन चर्चा एक फिक्सिंग आणि मॅनेज प्रकार असल्याचं कोणाही समजू शकेल अशी ती क्लिप आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध घडवून आणलेली चर्चा कितीही मॅनेज असली तरी ती सामान्य लोकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. कारण ३ मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या डीडी न्युज वाहिनीवर केवळ २०० रिअक्शन देखील मिळालेल्या नाहीत आणि ज्या पाच केमेन्ट आल्या आहेत त्यातील ४ मध्ये टीका आहे आणि १ अगदी भक्ताने मजबुरीने केल्याचे दिसतंय आणि यावरून प्लान फसल्याचे म्हणता येईल.

 

News English Summary: A high-level meeting chaired by Prime Minister Narendra Modi on Tuesday, June 1, decided to cancel the CBSE Class XII examination. This was a great relief to the CBSE board students across the country.

News English Title: After CBSE exam cancelation decision PM Narendra Modi interacted with the students as well as their parents news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x