16 April 2025 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

खबरदारी म्हणून अ‍ॅपल स्टोअर आणि गुगलने प्लेस्टोअर'वरून TikTok सह ५९ Apps हटवले

Chinese apps Apple, Google, TikTok from Playstore

नवी दिल्ली, ३० जून : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता. भारत सरकारच्या या निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मात्र या संदर्भात अ‍ॅपल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरुन हे अ‍ॅप हटवण्यात आलं आहे.

“अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन टिकटॉक हटवण्यात आलं आहे. भारत सरकारने काल ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली. ही अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे असं सरकारने सांगितलं होतं,” असे ट्विट एएनआयने केलं आहे.

 

News English Summary: The Indian government on Monday imposed a ban on 59 Chinese apps including TikTok, UC browser, Shareit, CamScanner among others. As per the latest developments, TikTok has already been removed from the App Store and Play Store while the other banned apps continue to feature on the two platforms.

News English Title: After government of India decision over Chinese apps Apple and Google has removed TikTok from Playstore News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#TikTok(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या