23 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा
x

कोरोना व्हायरस: चीनमधून ३२४ भारतीय विशेष विमानाने मायदेशी परतले

Air India Special Train, Corona Virus, 324 Indian Students

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन आत्तापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या गंभीर परिस्थितीतून चीनमधल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवलं होतं.

आज सकाळी ७.०० च्या सुमारासा हे विमान दिल्लीत दाखल झाले. वुहान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विमानामध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील ५ डॉक्टरांचे पथक होते. तसेच पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित होता. या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ती औषधे, मास्क, पाकीटबंद भोजन उपलब्ध होते. त्याशिवाय इंजिनियर्स आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथकसुद्धा विमानात तैनात करण्यात आले होते.

 

Web Title:  Air India special aircraft arrived at Delhi Airport with 324 students.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x