22 November 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सेतू App चा ब्रँड अँबेसिडर अजय देवगण भारत-चीन संघर्षावर फिल्म निर्मिती करणार

Ajay Devgn, Produce a film, Indian and Chinese soldiers, Galwan Valley in Ladakh

मुंबई, ४ जुलै : लडाखमधील गलवान खोऱ्या भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. या झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षण आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीवर अजय देवगण चित्रपट बनवणार आहे. सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. चित्रपटात चिनी सैनिकांशी लढा देणाऱ्या भारताच्या 20 जवानांचं बलिदान आणि शौर्य दाखवलं जाईल. चित्रपटाली कलाकारही अजून निश्चित झालेले नाहीत.”

विशेष म्हणजे २०१८ मध्ये अभिनेता अजय देवगनला फिल्म ‘रेड’मध्ये उत्कृष्ट अभिनयाबद्दल चीनच्या २७व्या ‘चाइना गोल्डन रूस्टर एंड हंड्रेड फ्लावर्स’ फिल्म महोत्सवात सर्वश्रेष्ठ विदेशी अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या अजय देवगण हा भारत सरकारच्या सेतू अँपचा ब्रँड अँबेसिडर देखील आहे. मागील काही काळात देखील निवडणुकीच्या तोंडावर लष्करावर असेच सिनेमा बनवले गेले आणि त्याचा संदर्भ अघोषित गव्हर्मेंट स्पॉन्सर्ससोबत जोडला गेला होता.

विशेष म्हणजे गलवान खोऱ्यात नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती केंद्राने सरकारने विरोधकांना देखील सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षेच्या कारणाखाली दिली नाही…मग अजय देवगण कोणत्या आधारावर फिल्मची निर्मिती करणार हाच कळीचा मुद्दा असेल.

 

News English Summary: Ajay Devgn is all set to produce a film based on the recent clash between Indian and Chinese soldiers in the Galwan Valley in Ladakh. 20 Indian soldiers sacrificed their lives fighting their Chinese counterparts on June 15.

News English Title: Ajay Devgn is all set to produce a film based on the recent clash between Indian and Chinese soldiers in the Galwan Valley in Ladakh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AjayDevgan(1)#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x