22 December 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

कोरोना आपत्तीत उत्तर प्रदेशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे - अलाहाबाद हायकोर्ट

India corona pandemic

अलाहाबाद, १८ मे |  मागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी देशात कोरोनाचे 3 रेकॉर्ड झाले. गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 लोकांनी कोरोनावर मात केली. एका दिवसात कोरोनामधून बरे होणारी ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी 8 मे रोजी 3.86 लाख लोक बरे झाले होते.

अशाप्रकारे, गेल्या 24 तासांत, सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रेकॉर्डमध्ये 1.63 लाखांची घट झाली आहे. यापूर्वी 16 मे रोजी उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 836 एवढी नोंदवण्यात आली होती. मात्र, मृतांचा आकडा चिंताजनक आहे. सोमवारी देशात 4,334 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात आपला जीव गमावणाऱ्यांची ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4,233 लोक मरण पावले होते.

दुसरीकडे, गुजरात नंतर आता उत्तर प्रदेशातील कोरोना स्थितीतीवरून अलाहाबाद हायकोर्टाने राज्य सरकारला झापल्याचे पाहायला मिळाले आहे. मेरठमधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक रुग्णच बेपत्ता झाल्याच्या मुद्द्यावरुन अलहाबाद हायकोर्टाने सोमवारी कठोर शब्दामध्ये सरकारी कारभारावर नाराजी व्यक्त केली. मेरठसारख्या शहरामधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर छोटी शहरं आणि गावांसंदर्भात बोलायचं झाल्यास राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे काम करत असल्याचं म्हणावं लागेल, अशा शब्दांमध्ये कोर्टाने उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. न्यायमूर्ति सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ति अजित कुमार यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राज्यातील करोना प्रादुर्भावासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे वक्तव्य केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन सुविधा असणाऱ्या बेड्सची संख्या वाढवण्यासंदर्भातही कोर्टाने भाष्य केलं आहे.

 

News English Summary: After Gujarat, the Allahabad High Court has now slapped the state government on the Corona situation in Uttar Pradesh. The Allahabad High Court on Monday expressed displeasure over the government’s handling of a case of disappearance of a patient at the district hospital in Meerut.

News English Title: Allahabad High court slams Yogi Sarkar over mismanagement during handling corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x