22 January 2025 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?

YSR, Shivsena, Narendra Modi

नवी दिल्ली : लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने वायएसआर काँग्रेस या आंध्र प्रदेशातील पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी आधीच दावा केला होता आणि हा आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचं म्हटलं होत. परंतु, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत खात्रीलायक वृत्त दिले आहे.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या या ऑफरला अद्याप जगनमोहन यांच्या पक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, जगनमोहन यांनी राजकीय समीकरणांवर विचारविनिमय करण्याचे कारण देत थोडा वेळ मागितला आहे. आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत. त्यामुळे भाजपाच्या या ऑफरला स्विकारण्यापूर्वी जगनमोहन यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायची आहे. त्यानंतर ते भाजपाचा प्रस्ताव स्विकारायचा की नाकारायचा यावर निर्णय घेणार आहेत.

आंध्र प्रदेशातील स्थानिक बातम्यांनुसार, जगनमोहन रेड्डी आणि नरसिम्हा राव यांच्यामध्ये अर्धातास चर्चा झाली. ही भेट एक औपचारिक भेट सांगण्यात आले मात्र, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरुनच नरसिम्हा राव हा प्रस्ताव घेऊन जगनमोहन यांच्याकडे गेले होते, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या सरकारच्या काळात सन २०१४ मध्ये भाजपाने एनडीएचा भाग नसलेल्या अद्रमुकला लोकसभा उपाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. त्यानुसार, अद्रमुकच्या थंबीदुराई यांना उपसभापती बनवण्यात आले होते. त्यानंतर अद्रमुक एनडीएत सहभागी झाली होती. त्यावेळी अद्रमुक सर्वाधिक लोकसभा जागा जिंकणारा तीसरा पक्ष होता. त्यानंतर आताही भाजपाकडून याच फॉर्म्युल्याचा वापर करुन वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षपद देऊन एनडीएत समाविष्ट करुन घेण्याचा मानस असावा.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x