23 December 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

लडाखमध्ये परिस्थिती गंभीर, लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना पूर्ण माहिती दिली

Army Chief, Prime Minister Narendra Modi, Ladakh

नवी दिल्ली, २७ जून : चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केंद्र सरकारवर केले होते. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला होता.

भारत-चीन सीमेवर ४५ वर्षांनी रक्त सांडलं आणि राजकीय वर्तुळातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. निवृत्त ले. जनरल एच एस पनाग यांच्या मुलाखतीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला होता. सीमेवर आपल्या जवानांना विनाशस्त्र का पाठवलं. गलवान खोऱ्यात जी घटना घडली, त्यात गोळीबार झाला नाही असं सांगितलं गेलंय. चीननं कसा विश्वासघात केला हे परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्ययातही समोर आलं. पण मुळात आपल्या जवानांना तिथे विनाशस्त्र का पाठवलं गेलं. त्यांना कुठलंही बँकिंग का दिलं गेलं नव्हतं असा आरोप काँग्रेसनं केलाय.

सध्यातरी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये कुठलीही चर्चा होणार नाही तसेच चीनने पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे. फिंगर फोरवर चीनने हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणी सुरु केली आहे. पँगाँग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चिनी सैन्य तुकडयांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर फोरवर दावा सांगत आहे. त्यादृष्टीने त्यांनी तिथे सुरु केलेली तयारी निश्चित धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरला आहे. यापू्र्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे.

“पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केलीय हे बरोबर आहे. मागच्या आठ आठवडयात त्यांनी फिंगर क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामे केली आहेत, त्यात हेलिपॅड आणखी एक नवीन काम आहे” एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी शुक्रवारी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला लडाखमधील परिस्थितीची आणि भारतीय सैन्याच्या तयारीची माहिती दिली. युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. चीनने कुठलीही आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे.

पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील भागांना भेट देऊन आल्यानंतर लष्करप्रमुख नरवणे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर काल शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. भारताने आपल्या तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. बोफोर्स, हॉवित्झर तोफा, टी-९०, टी-७२ रणगाडे तैनात केले आहेत. इंडियन एअर फोर्सचे सुखोई-३० एमकेआय आणि मिग-२९ या फायटर विमानांची आकाशात नियमित गस्त सुरु आहे. सैन्य तुकडयांबरोबरच घातक शस्त्रास्त्र तयार आहेत. त्याशिवाय चिनूक, अपाची हेलिकॉप्टरच्या फेऱ्याही सुरु आहेत.

 

News English Summary: Chief of Army Staff General MM Narwane on Friday briefed the country’s top leadership on the situation in Ladakh and the readiness of the Indian Army. The Indian Army is fully prepared to deal with the war situation.

News English Title: Army Chief Briefed Prime Minister Narendra Modi Over Ladakh Situation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x