27 January 2025 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

एमपीत भाजप नेत्याने लष्करातील जवान अंशू तोमरला पळवून पळवून गोळ्या घातल्या होत्या

Army Jawan Anshi Tomar, BJP leader in Madhya Pradesh, Marathi News ABP Maza

ग्वालियर, १३ सप्टेंबर : नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली होती.

त्यानंतर नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या मुलाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप आहे. मदन शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. या मारहाण प्रकरणावरुन भाजपाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. विषय नौदलाच्या माजी जवानाशी संबंधित सल्याने भाजपने देखील भावनिक राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत असलं भाजप नेत्यांकडून त्याहून भयानक प्रकार मध्य प्रदेशात ११ फेब्रुवारी २०१८ मध्ये घडला होता.

मध्यप्रदेशात भारतीय सैन्यातील जवान अंशू तोमर यांना भाजपचे स्थानिक नेते आणि नगरपालिका उपाध्यक्ष नीतू तोमर तसेच त्यांच्या समर्थकांनी पळवून पळवून गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर भारतीय सैन्यातील जवान अंशू तोमर हे गंभीर प्रकारे जखमी झाले होते आणि त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.

मुरैना जिल्ह्यातील अम्बाह कस्बे येथे सदर घटना घडली होती. स्थानिक लोकांना फायरिंगचा आवाज येऊ लागल्याने एनेकजण जमा झाले होते आणि त्यांनी उघड्या डोळ्यांनी एका लष्करातील जवानावर फिल्मी अंदाजात पळवून पळवून गोळ्या घालताना भाजप नेत्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाहिलं होतं. त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. पोटात गोळी लागल्याने जवान अंशू तोमर गंभीर जखमी झाले होते. काही दिवसांसाठी ते सुट्टीवर आले असता ही घटना घडली होती.

महत्वाची टीप : याबाबत अधीकृत वृत्त ANI, बिझनेस स्टॅंडर्ड, इंडियन एक्सप्रेस, द क्विन्ट आणि पत्रिका मध्ये प्रसिद्ध झालं होतं.

 

News English Summary: An Army jawan was critically injured after being allegedly shot by a local Bharatiya Janata Party (BJP) leader in Madhya Pradesh’s Morena on 11 February 2018, reported ANI. Local BJP leader Nitu Tomar shot Jawan Anshu Tomar, alleged a friend of the Army personnel, who was at the spot at the time of the incident.

News English Title: Army Jawan Anshi Tomar was allegedly shot by BJP leader in Madhya Pradesh in February 2018 Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x