25 November 2024 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

वाराणसीत माजी लष्कर व निमलष्कराचे जवान मोदींविरोधात प्रचार करणार

Narendra Modi, BJP, Indian Army, Loksabha Election 2019

वाराणसी : वाराणसीत शंभरहून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून भष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचं जवानांचं म्हणणं आहे. हे सर्व जवान वाराणसीमधील मडुआ डीह येथे वास्तव्यास थांबले आहेत.

हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान तेज बहादूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व जवानांनी नरेंद्र मोदींना उमेदवारी अर्ज दाखल करताना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला होता. आपण एक खरे चौकीदार असून, खोट्या चौकीदाराविरोधात लढत आहोत असं तेज बहादूर यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे आपण लष्कराला योग्य मान मिळवून दिल्याचा दावा करत असतानाच तेज बहादूर यांचा प्रचार सुरु आहे. नरेंद्र मोदी आपण पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं सांगत मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. याचप्रकरणी माजी लष्कर प्रमुखांसहित अनेक निवृत्त जवानांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे.

सर्जिकल स्ट्राइकसहित अशी दोन कारणं आहेत ज्यासाठी माजी आणि निलंबित जवानांनी मोदींना विरोध केला आहे. २९ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी जवान नरेंद्र मोदींना दोषी ठरवत आहेत. याशिवाय २०१४ लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केल्याचं आश्वासन देऊनही अद्याप भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत देत आहेत.

आपले अधिकारी आणि भ्रष्टाचाराचा विरोध केल्याची किंमत आपल्याला चुकवावी लागत असल्याचं जवानांचं म्हणणं आहे. सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. २००१ साली लष्करातून निवृत्त झालेले ६२ वर्षीय ओम प्रकाश सिंह यांनी सांगितलं आहे की, ‘सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राइक पहिलीच नव्हती. मी स्वत: याआधी पाकिस्तानात जाऊन कऱण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा भाग राहिलो आहे’.

सीआरपीएफमधून निलंबित झालेले ३२ वर्षीय पंकज मिश्रा यांनी सांगितलं आहे की, ‘जवानांकडून जवळपास ४,००० तक्रारी आल्या आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांकडून आपल्या घरातील छोटी कामं करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचाही उल्लेख आहे. या सर्व तक्रारी मागील ३ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात प्रलंबित आहेत’.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x