VIDEO | अर्नबने योगींना अशिक्षित-पागल म्हटलेले | पण योगींकडून अर्नबची स्तुती

लखनऊ, ६ नोव्हेंबर: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अनेक मुद्दे प्रचार सभांमध्ये वापरल्याचे पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात जुलै-ऑगस्टमध्ये महिन्यात दोन पत्रकारांची क्रूर हत्या करण्यात आली होती. त्यावेळी चाकर तोंडातून चकार शब्द न काढणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या भावना अर्णब गोस्वामीसाठी उफाळून आपल्याच पाहायला मिळालं.
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका जाहीर सभेत, अर्णब गोस्वामी हे एक प्रसिद्ध आणि मोठे पत्रकार आहेत, असे म्हटले आहे. परंतु, यापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी एका LIVE टीव्ही शोदरम्यान आदित्यनाथ यांना अशिक्षित आणि पागल म्हटले होते. मात्र त्यानंतर विरोधकांनी त्यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. सपाचे प्रवक्ते पवन पांडे यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे म्हटले आहे. पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
या VIDEO’मध्ये सीएम योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाचा काही भाग आहे. त्यात काँग्रेसवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा थेट आरोप करत आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथांनी म्हटले की, ‘1975मध्ये काँग्रेसने आणीबाणी लादली होती आणि आजच आपण पाहिले असेल, की देशातील एका फार मोठ्या पत्रकाराला आपल्या स्वार्थासाठी अटक करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे.’
दरम्यान, या व्हिडिओच्या शेवटी, अर्णब गोस्वामी यांच्या त्या टाइम्स नाऊ TV शोचाही काही भाग दाखवण्यात आला आहे. यात अर्णब गोस्वामी म्हणाले होते, ‘योगी आदित्यनाथ तर असे व्यक्ती आहेत, त्यांना धर्माच्या बाबतीत काही माहीतच नाही. असे अशिक्षित व्यक्ती आहेत, की कुणी सांगायला हवे, आपण आपले मेंटल बॅलेन्स चेक करून घ्या.’
क्या से क्या हो गया देखते-देखते…@yadavakhilesh @samajwadiparty @MediaCellSP @aashishsy @brajeshlive @pankajjha_ @ndtv @ABPNews #pawanpandeysp pic.twitter.com/OkvNpHRt0f
— Pawan Panday (@pawanpandeysp) November 5, 2020
विशेष म्हणजे ज्या आदित्यनाथ यांना अर्णब अशिक्षित आणि पागल म्हटले होते त्याच अर्णब गोस्वामीला अटक झाल्यावर Republic TV’वर देखील योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनाचे व्हिडिओ शेअर करण्याची वेळ आली आहे.
#IndiaWithArnab | वरिष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी की गिरफ्तारी कांग्रेस पार्टी के द्वारा अभिव्यक्ति की आजादी पर प्रहार है: CM योगी@myogiadityanath#ArnabGoswami के समर्थन में भेजे अपना वीडियो संदेश https://t.co/G945HvRmSx
YouTube live TV:https://t.co/GEWccyMyeG pic.twitter.com/FftjEvkDJp
— रिपब्लिक.भारत (@Republic_Bharat) November 4, 2020
News English Summary: UP Chief Minister Yogi Adityanath has said in a public meeting in Bihar that Arnab Goswami is a famous and great journalist. But earlier, Arnab Goswami had called Adityanath uneducated and insane during a LIVE TV show. But since then, opponents have begun to take their turn. SP spokesperson Pawan Pandey shared a video on social media saying, “Kya se kya ho gaya dekhte-dekhte.” The video, posted by Pawan Pandey, is now being widely shared on social media.
News English Title: Arnab Goswami had called CM Yogi Adityanath illiterate and Mental now CM Adityanath appreciate Arnab in Bihar Rally News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल