मुंबई : पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.
मिलिंद एकबोटेंना अटक झाली असली तरी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना अजून अटक झालेली नसल्याने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे प्रचंड मोर्चा काढू असा थेट इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
मिलिंद एकबोटे यांना आधीच १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.






























