7 January 2025 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663
x

गुजरातमध्ये गुड टच-बॅड टचच्या नावाखाली ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Atrocities and rape, Three girls, Gujarat, Good Touch Bad Touch

वडोदरा, ९ ऑक्टोबर : हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात धक्कादायक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका इसमाने तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाळकरी मुलींना चॉकलेटचे अमिष दाखवून हा नराधम चिमुकल्या मुलींवर अत्याचार करत होता. वडोदरा जिल्ह्यातील मकापुरा येथील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत डीसीपी लखधीरसिंग झाला यांनी माहिती देताना म्हटले की, शाळेतील मुलीने सर्वप्रथम आपल्या शिक्षिकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यावरुन, ही घटना उघडकीस आलं आहे. शिक्षकांकडून ‘गुड टच आणि बॅड टच’ चे धडे शिकवत असताना, या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग शिक्षकांना सांगितला. त्यानंतर, पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेत शिक्षकांनी नराधमाच्या कृत्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी, पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, आणखी दोन मुलींवर बलात्कार केल्याचेही सांगितले. चॉकलेटचे अमिष दाखवून आपण तीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोपीने मान्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली आहे.

 

News English Summary: Three minor girls, aged six, nine and twelve years, were repeatedly raped by a 44-year-old man in Gujarat’s Vadodara for over a year. The matter came to fore on Wednesday when one of the three survivors began crying while attending lessons about ‘good touch and bad touch’, and narrated her ordeal. Police said Rajnikant Mahato, the accused, and the three minor survivors are residents of the same building in Makarpur area. Over the last one year, he has allegedly sexually assaulted the girls multiple times in the elevator of the building or after calling them to his house in the absence of his wife.

News English Title: Atrocities and rape on three girls in Gujarat incident revealed while learning Good Touch Bad Touch Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x