22 April 2025 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे; चिराग पासवान यांची भाजपवर टीका

Chirag Paswan, BJP, Govt Formation

मुंबई: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने (Shivsena, NCP and Congress) केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आदेश देणार आहे. दोन्ही बाजूंकडून सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारचा शपथविधी उरकण्यात आला आहे. त्यामुळे विश्वासमताची तारीख लवकरात निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करत या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) याचिका केली आहे.

तत्पूर्वी, शिवसेना-काँग्रेस-एनसीपी यांच्यासह छोटय़ा पक्षांच्या १६२ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी राजभवनात जाऊन सादर केले. या वेळी राज्यपाल नवी दिल्लीत होते, पण त्यांच्या सचिवालयाकडे हे पत्र देण्यात आले. १६२ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे फडणवीस सरकार (Devendra Fadnavis Government) हे अल्पमतात असल्याचे सिद्ध होते, असे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवारांचा (Ajit Pawar) आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात होती. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

दुसरीकडे, केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या