14 January 2025 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

आम्ही धर्माचा इव्हेंट करून त्याचा राजकारणासाठी वापर करत नाही - कमलनाथ

Ayodhya Ram Mandir, Bhoomi Pujan, PM Narendra Modi

भोपाळ, ४ ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं की, प्रभू राम सर्वांचे आहे, आता आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. जर यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. राजीव गांधींनी १९८५ मध्ये याची सुरुवात केली होती. १९८९ मध्ये शिलान्यास केला होता, राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, आम्ही धर्माचा वापर राजकारणासाठी करत नाही, आम्ही त्याचे इव्हेंट साजरे करत नाही. आमचे विचार धार्मिक असले तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत नाही. मुहूर्त पाहून काम करत नाही, राज्यातील जनतेच्या आनंदासाठी आम्ही हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित केला आहे. साधू, संत आणि शंकराचार्य यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाले आहेत असंही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले.

 

News English Summary: It is because of Rajiv Gandhi that the dream of building a Ram temple is coming true. It was supposed to be today. He informed that 11 silver bricks will be sent by the people of the state for the construction of Ram temple said K Kamalnath.

News English Title: Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan Minute To Minute Program Pm Narendra Modi Security Reason Coronavirus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x