22 November 2024 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सकाळी म्हणाले निमंत्रणाची गरज नाही, आता पत्रं लिहून म्हणतात मुख्यमंत्र्याना निमंत्रण द्या

Ayodhya Shriram temple, CM Uddhav Thackeray, Shivsena MLA Pratap Sarnaik

नवी दिल्ली, २० जुलै : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.

पवार म्हणाले होते, “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”

दरम्यान, मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे निमंत्रण अद्याप आले नाहीय. अयोध्येतील राम मंदिर भुमीपुजनास सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करावे असे पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेय. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला हे पत्र पाठवण्यात आलंय.

श्रीराम मंदिराच्या निर्मिती लढ्यात उद्धव ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रित करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलीयं. खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. श्रीराम मंदीराच्या निर्माण कार्यात शिवसेनेने सर्वात आधी निधी जाहीर केला होता. आमचं नात प्रभु रामाशी आहे, मंदिर निर्माणाशी आहे. त्यामुळे निमंत्रणाला न बोलावण्याने काही फरक पडत नसल्याचे खासदार सावंत म्हणाले होते.

 

News English Summary: Shiv Sena MLA Pratap Saranaik has written a letter to invite Chief Minister Uddhav Thackeray to the Ram Mandir Bhumi Pujan ceremony in Ayodhya. The letter was sent to the Shriram Janmabhoomi Shrine Trust in Ayodhya.

News English Title: Ayodhya Shriram temple trust should invite CM Uddhav Thackeray Shivsena MLA Pratap Sirnaik wrote letter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x